जळगावसह अमळनेर व भुसावळ शहरांचा लाॅक डाऊन संपला..!

उद्यापासून अनलाॅकची प्रक्रिया सुरू  ६ जुलै पूर्वीचे चे नियम लागू राहणार जळगाव, दिनांक १३ जुलै

Continue Reading

चिंचवड येथील ईएसआय रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांचे हाल ; रुग्णांना सुरक्षा साहित्य पुरविण्यात भांडार विभाग प्रमुखांचे अक्षम्य दुर्लक्ष

रूग्णांना साहित्य किट देण्यात भेदभाव,जेवणाच्या दर्जाबाबत रुग्णांचा संताप पुणे, दिनांक १३ जुलै  पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात विळखा बसला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना बाधितांची रुग्णसंख्या चिंताजनक आहे. कोविड रुग्णांवर महापालिका रुग्णालय तसेच काही खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. मात्र कोरोना रुग्णांना साहित्य कीट देण्यात भेदभाव केला जात असल्याची पिंपरी-चिंचवड येथील परिस्थिती […]

Continue Reading

राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा-बिरसा क्रांती दलाची मागणी

यवतमाळ |राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)  दिनांक १३ जुलै डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘ राजगृह ‘ निवास्थानामधील आवारात तोडफोड करुन हल्ला करण्या-या समाजकंटकांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, ग्रुहमंत्री, पोलीस महासंचालक यांना संघटनेने  ई – मेल द्वारे निवेदन पाठविले आहे. निवेदनाच्या सुरुवातीलाच राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. […]

Continue Reading

१५ ते २१ जुलै पर्यंत सात दिवस पुसद शहरात कडकडीत शट डाऊन

अत्यावश्यक सेवा वगळता भाजीपाला व किराणा दुकाने बंद राहणार लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटनांशी चर्चा करून प्रशासनाचा कठोर निर्णय  पुसद |राजेश ढोले, दिनांक १३ जुलै पुसद शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असले तरी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सूचनांना नागरीक गांभीर्याने घेत नसल्याचे […]

Continue Reading

धरणगावचा ॲम्बुलन्स चालक “बंडू” भाऊंचा भारत मुक्ती मोर्चा करणार सन्मान

        धरणगाव, दिनांक १३ जुलै संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंचा कहर भारतातही गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसत आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली आले असताना कोरोना योद्धे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ठामपणे रुग्णसेवा करीत आहेत. अशाच कोरोना योद्धांमध्ये ॲम्बुलन्स चालक महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. धरणगाव तालुक्यातील पिंप्री परीसरात निष्काम कर्मयोग्याचे कर्तव्य […]

Continue Reading

कोरोना : पिंप्री गावासह बाजारपेठ मंगळवार पर्यंत बंद

धरणगांव,दिनांक १३ जुलै   तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या व  आतापर्यंत सुरक्षित असलेल्या  पिंप्रीत कोरोनाच्या पहिला रूग्ण आढळला . त्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून घेण्यात आले असून त्या व्यक्तींना धरणगाव सेंटरला पाठविण्यात आले आहे. त्या संशयित व्यक्तींचे स्वॅबच्या तपासणी अहवाल येई पर्यंत म्हणजेच दिनांक १४ जुलै मंगळवार पर्यंत पिंप्री गावासह बाजारपेठ […]

Continue Reading

“त्या” नराधमाच्या मुसक्या आवळणारे पोलिस कौतुकास पात्र ; आरोपी सात दिवसांच्या पोलीस कोठडीत

♦ भोले भक्त आरोपीची विकृत मानसिकता ♦  कचरा वेचणाऱ्या मुलांची आखोदेखी ठरली पोलीस तपासात मोठा दुवा जळगाव, दिनांक १३ जुलै “ भिक्षा मागणाऱ्या दहा वर्षाच्या मुलीवर खाऊचे आमिष दाखवून भरदुपारी गोलाणी मार्केटमध्ये नेेत  लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध घेताना कचरा वेचणाऱ्या मुलांची आखोदेखी पोलीस तपासात महत्त्वाचा दुवा ठरले. कोणतीही धागेदोरेे गवसत नसतांना बारकाईने तपास करणाऱ्या […]

Continue Reading

भय इथले संपत नाही..! जळगाव जिल्ह्यात कोरोनाची वाटचाल चिंताजनक

• आज २३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह जिल्ह्याची रुग्ण संख्या सहा हजाराच्या उंबरठ्यावर आज कोरोनाने आठ जणांचा मृत्यू जळगाव, दिनांक १२ जुलै                                 “जळगाव जिल्ह्यात आज  २३८ कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५९६२ झाली […]

Continue Reading

खिरवड येथे सात दिवसांचा जनता कर्फ्यू , नागरिकांनी सहकार्य करावे-ग्रामपंचायतीचे आवाहन

  रावेर|नजमोद्दिन शेख, दिनांक १२ जुलै जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा कहर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जळगाव जिल्ह्याने तर कोरोनाच्या वाढत्या मृत्यूदरामुळे संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ४०० पार झाला आहे. रावेर तालुक्यातील खिरवड गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने गावात सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा […]

Continue Reading

ऐश्वर्या रॉय बच्चन व आराध्या बच्चन देखील कोरोनाच्या कचाट्यात, दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह;घरीच क्वारंटाईन राहणार

जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह   अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर  चाहत्यांकडून देशभरात प्रार्थना मुंबई,  दिनांक १२ जुलै- ‌‌‌‌‌‌‌‌‌‌                  महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचे कोरोना चाचणी अहवाल […]

Continue Reading