खळबळजनक : मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याकडं २५०० कोटींची मागणी केल्याचा भाजपा आमदाराचा दावा ; कर्नाटकात राजकीय चर्चेला उधाण

बंगळूरू / सिटीझन मिरर वार्ता कर्नाटकातील भाजप आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी २५०० कोटींची मागणी करण्यात आली होती असा दावा केल्याने कर्नाटकात खळबळ उडाली असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते  डीके शिवकुमार यांनी केली आहे. लिंगायत पंचमसाली समाजाच्या अधिवेशनात बोलताना विजयपुरा […]

Continue Reading

मुक्ताईच्या पावन भूमीत गुंडांचा थरार..! रोहिणीताई खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागचे सत्य बाहेर येईल का..?

जळगाव |सिटीझन मिरर वार्ता राजकीय सभ्यतेचा मर्डर करणारा दाक्षिणात्य सिनेमातल्या कथानकाला शोभेल असा गुंडांच्या दहशतीचा हैदोस मुक्ताईनगर – बोदवड तालुक्यात मागील काही दिवसात सातत्याने खुल्या आणि छुप्या मार्गाने सुरू आहे. यात जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण तडफदार आक्रमक नेत्या रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याने राजकीय गुंडांचा माज जिल्ह्याच्या राजकारणातला काळा […]

Continue Reading

दिलासा : मंदाताई खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

तूर्तास अटक न करण्याचे उच्च न्यायालायचे ईडीला निर्देश मुंबई (सिटीझन मिरर वार्ता):- पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांच्या पत्नी मंदा करण्याताई खडसे  यांना उच्च न्यायलयाने मोठा दिलासा दिला आहे.मात्र १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर पर्यंत तपास कामात  सहकार्य करावे अशा सूचना त्यांना न्यायालयाने दिल्या. तूर्तास मंदाताई खडसे यांना अटक करू […]

Continue Reading

बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर मिळालेल्या विजयाचा एमआयएम कार्यकर्त्यांनी जळगाव शहरात पेढे वाटून केला जल्लोष

जळगाव, दिनांक ११ नोव्हेंबर बिहार विधानसभा निवडणुकीत खा.बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम या पक्षाने जबरदस्त प्रदर्शन करत पाच जागांवर विजय मिळविला आहे. या विजयाचा जल्लोष करून जळगाव शहरातील  एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना  पेढे वाटून आनंद साजरा केला. बिहार मधील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे एमआयएमचा बिहारच्या राजकारणात दमदार प्रवेश झाला असून नागरिकांच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी […]

Continue Reading

प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत झालेल्या ऊस ऊस तोडणी कामगार मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २६ ऑक्टोबर दसऱ्याच्या निमित्ताने खरवंडी येथे ऊसतोडणी कामगार संघटना, मुकादम, वाहतूकदार यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर हे देखील आले होते. मात्र, आता या मेळाव्याच्या आयोजकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारींच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, रविवारी भगवानगडाच्या पायथ्याशी […]

Continue Reading

“भाऊ”.. या ना लवकर..! राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्यांची नाथाभाऊंना प्रेमळ साद

मुक्ताईनगर| विशेष प्रतिनिधी, दिनांक १६ ऑक्टोबर “भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे हे भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असतांनाच गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांनी थेट मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसवर खडसेंची भेट घेऊन “भाऊ..” या ना लवकर..! अशी प्रेमळ साद देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याचे खुले निमंत्रण दिले.” राज्यातील […]

Continue Reading

कृषीसंबंधी विधेयकाच्या निषेधार्थ अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांच्या राजीनाम्याने मोदी सरकारला धक्का

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १७ सप्टेंबर                   “ केंद्र सरकारने संसदेत आणलेल्या कृषी संबंधित विधेयकाच्या निषेधार्थ केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. हरसिमरत कौर या एनडीएचे घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या […]

Continue Reading

घरची धुणी मी रस्त्यांवर कधीच धुत नाही ; देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथराव खडसे यांच्यावर पलटवार

• पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडले होते टिकास्त्र सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ११ सप्टेंबर       “ एकनाथराव  खडसे यांच्या जीवनावर आधारीत सुनील नेवे लिखित पुस्तकाचे खडसे यांच्या हस्ते प्रकाश झाले. या प्रकाशन कार्यक्रमात एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.खडसे यांनी काल केलेल्या टीकेला फडणवीस यांनी […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी विनोद सोनवणे यांच्या फेरनिवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

• वंचित बहुजन आघाडीचेेे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी घोषित केलेल्या जळगाव पूर्व कार्यकारणीत तीन उपाध्यक्ष व तीन महासचिव, दोन सचिव,एक कोषाध्यक्ष,एक प्रवक्ता, एकआयटी सेल प्रमुख भुसावळ | प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली असून जिल्हाध्यक्षपदी विनोद सोनवणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.रावेर लोकसभा […]

Continue Reading

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट; चर्चेला उधाण

मुंबई,दिनांक २३ मे गेल्या काही दिवसांपासून राज्यपालांवर टीका करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. ते राजभवनावर राज्यपालांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. या भेटीमागील नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी संजय राऊत यांनी ही एक सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं आहे. असे असले तरी या […]

Continue Reading