यश : रावेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी हर्षिका जितेंद्र पाटील दहावी परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण

रावेर / नजमोद्दिन शेख दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक १७ जून रोजी ऑनलाईन घोषित झाला.या निकालाचे वैशिष्ठ म्हणजे यंदाही मुलांच्या तुलनेत मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे. रावेर तालुक्यात देखील दहावी परीक्षेत अनेक मुलींनी घवघवीत यश मिळवले आहे. रावेर शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या कू. हर्षिका जितेंद्र पाटील दहावी परीक्षेत ९०.२०% गुण मिळवून उत्तीर्ण […]

Continue Reading

तिसऱ्या अपत्याची मुसीबत.; पतपेढीचे संचालक झालेल्या‌ नगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपात्रतेची नौबत

.  अमळनेर येथील पू.सानेगुरुजी न.पा.वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सह. पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक श्री.युवराज श्रीपत चव्हाण यांना रघुनाथ रामभाऊ मोरे यांच्या तक्रारीवरून सहाय्यक निबंधकांनी अपात्र घोषित केले आहे. अमळनेर /  द सिटीझन मिरर वार्ता मागील महिन्यात निवडून आलेले अमळनेर येथील पू.साने गुरुजी न.पा.वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक श्री.युवराज श्रीपत चव्हाण यांना श्री.किशोर पाटील, सहायक निबंधक (सहकारी संस्था) […]

Continue Reading

बुद्ध पौर्णिमा व सखाराम महाराज यात्रोत्सवा निमित्त फरशी रोड येथे युवकांनी केले अन्नदान

अमळनेर / प्रतिनिधी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिन व शहरात सुरू असलेला संत सखाराम महाराज यांचा यात्रोत्सवातील पालखी सोहळ्या च्या पार्श्वभूीवर अमळनेर शहरातील फरशी रोड येथील युवकांनी अन्नदान केले. संपूर्ण जगभरात बुध्द पौर्णिमा संपन्न झाली. याच दिवशी राज्यात प्रसिद्ध असलेल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला पालखी […]

Continue Reading

बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्तीचा डोस पाजण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांचा आक्रमक पवित्रा

अचानक तपासणीत अनेक कर्मचारी गैरहजर… विभाग प्रमुखांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस… जळगाव / सिटीझन मिरर वार्ता महापालिका आयुक्त पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर डॉ. विद्या गायकवाड यांनी बेशिस्त मनपा कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फोडला आहे.कर्मचाऱ्यांना प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी आयुक्तांनी लक्ष घातले असून पहिल्याच दिवशी मनपाच्या इमारतीजवळ ते स्वतः कर्मचाऱ्यांची हजेरी घेत असताना अनेक कर्मचारी कामाची वेळ पाळत […]

Continue Reading

जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेला अमळनेर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद ; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेसह नागरिकांनी दिला बंधुभावाचा संदेश

पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेत मान्यवरांसह सर्वधर्मीय नागरिकांनी संदेश लिहून घेतला सहभाग     अमळनेर /सिटीझन मिरर वार्ता राज्यात मागील काही दिवसांपासून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजविघातक प्रवूर्त्ती कडून सुरू असल्याचे दिसत असताना अमळनेर शहरातील जनतेने आपापसातील बंधुभाव जोपासत जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक […]

Continue Reading

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे प्रतिक सपकाळे यांचा युवा भूषण पुरस्काराने गौरव

जळगाव / सिटीझन मिरर वार्ता आंबेडकरी चळवळीतील युवक कार्यकर्ते तसेच आयटीआय च्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे धामणगाव गावातील प्रतिक सपकाळे यांना पुणे येथील निर्मिका फाऊंडेशन या संस्थेने युवा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला लोकप्रतिनिधी अनेक मान्यवर उपस्थित होते.महाकवी वामनदादा कर्डक यांचे नातू श्री. हरेशभाई देखणे हे निर्मिका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष […]

Continue Reading

जळगाव शहरातील कुंटणखान्यात विकृत शौकीनांची रंगलेली मैफिल पोलिसांनी उधळली

जळगाव / सिटीझन मिरर वार्ता मागील अडीच वर्षात जळगाव शहरातील उच्चभ्रु वस्तीतील सुरू असलेले कुंटणखाने पोलीस कारवाई नंतर बंद पडतील असे वाटत असताना आजही अनेक वसाहतीत चोरून लपून गरजू महिलांना वाम मार्गाला लावून शौकिनांची शारीरिक भूक भागविणारा अनैतिक धंदे सुरू असल्याची चर्चा नेहमीच होत असते. असाच एक कुंटणखाना नवीन सम्राट कॉलनीत सुरू असल्याची माहिती मिळताच […]

Continue Reading

संतापजनक : मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचा पुजाऱ्याने केला विनयभंग; जळगाव शहरातील घटना, पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव / सिटीझन मिरर वार्ता मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचा पुजाऱ्याने विनयभंग केल्याची संतापजनक घटना जळगाव शहरात घडली असून पुजाऱ्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील एका मंदिरात मागील काही दिवसांपासून नियमित देवदर्शनासाठी येत असलेल्या महिलेला महिनाभरापासून बालकदास महाराज नामक पुजारी वाईट नजरेने पाहत होता.याबाबत सदर महिलेने तिच्या पती कडे पुजाऱ्याची तक्रार केली […]

Continue Reading

खळबळ : जळगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा मृतदेह आढळला

घातपात की अन्य काही या दृष्टीने पोलीस तपास सुरू जळगाव / सिटीझन मिरर वार्ता दोन व्यक्तींचा वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. दोन्ही घटनेत घातपात आहे की अन्य काही कारणे आहेत याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, मेहरूण परिसरातील बंद पडलेल्या स्वीमिंग पूलमध्ये ५२ वर्षीय […]

Continue Reading

कचरा जाळतांना वापरुन फेकलेल्या बॉडी स्प्रे बाटलीचा स्फोट : जळालेले धर्मेंद्र बोथरा यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू

आपले व्यक्तिमत्त्व उठावदार व्हावे इतरांवर आपला प्रभाव पडावा अशी प्रत्येकाची ईच्छा असते.यासाठी विविध सौंदर्यप्रसाधने वापरून आपले व्यक्तिमत्व आकर्षक केले जाते.मात्र, वापरून झाल्यावर साैंदर्य प्रसाधने कचऱ्यात फेकल्या नंतर त्याचे काय दुष्परिणाम होतील याचा कोणताही विचार केला जात नाही. वापरलेली सौंदर्यप्रसाधने कशी जीवघेणे ठरू शकतात हे जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम कॉलनी मध्ये झालेल्या घटनेवरून लक्षात येईल. […]

Continue Reading