पिंपरी चिंचवड येथील मनपाच्या यशवंतराव चव्हाण दवाखान्यातील डॉक्टरांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून केले आंदोलन

पुणे, दिनांक १६ जून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांनी सोमवार दिनांक १५ जून रोजी वेतन वाढीच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले.महानगरपालिकेच्या रुग्णालयात पदवीधारक आणि पदव्युत्तर असे ४० ते ४५ डॉक्टर काम करीत आहेत. कोरोनाच्या संकटात सुद्धा खांद्याला खांदा लावून हे सर्व डॉक्टर्स आपलं कर्तव्य बजावत आहेत. या डॉक्टरांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासनाने आदेश […]

Continue Reading

राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करेल-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

पुणे, दिनांक २९ मे तीन महिन्यापूर्वीच तयार झालेला पण उद्घाटन झाले नसल्याने वापरण्यासाठी रखडलेल्या काळेवाडी साई चौक येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची अजितदादा पवार यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. कोरोनासह लॉकडाऊन संबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादा पवार यांनी लवकरच राज्य शासन मोठे […]

Continue Reading

कोरोना मृत्यू: पुण्यातील पाच महिला सफाई कामगारांना अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेची श्रद्धांजली; आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरविण्याची मागणी

पुणे |विशेष प्रतिनिधी दिनांक २४ मे पुणे महानगरपालिकेतील चार महिला सफाई कामगार व कमला नेहरू रुग्णालयातील एक अशा एकूण पाच महिला सफाई कर्मी यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याने अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कोणत्याही आरोग्य सुविधा नसताना जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या सफाई कामगार, नर्स, सेविका, सेवक, डॉक्टर्स यांना पन्नास […]

Continue Reading

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांसह चार जण कोरोना पॉझिटिव्ह

पुणे, दिनांक २० मे संपूर्ण देशात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असून मुंबई, पुणे व पिंपरी-चिंचवड येथे कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे. राज्यातील पोलिस विभागातही बंदोबस्ताला तैनात असणाऱ्या अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येऊ लागले आहे.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस निरीक्षकासह आज चार जण करोनाबाधित आढळले आहेत. यामुळे आयुक्तालयातील कोरोनाबाधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या […]

Continue Reading

शाळा सुरु झाल्यावरच मुलांना मिळणार निकाल

पुणे – राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने गेल्या महिन्यापासून शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात पाठविले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना सन २०२०-२१ नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरु झाल्यानंतरच निकालपत्रक ( प्रगतीपत्रक) देण्यात येणार आहेत. करोनामुळे शालेय कामकाज, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, निकाल […]

Continue Reading