प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत झालेल्या ऊस ऊस तोडणी कामगार मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २६ ऑक्टोबर दसऱ्याच्या निमित्ताने खरवंडी येथे ऊसतोडणी कामगार संघटना, मुकादम, वाहतूकदार यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर हे देखील आले होते. मात्र, आता या मेळाव्याच्या आयोजकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारींच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, रविवारी भगवानगडाच्या पायथ्याशी […]

Continue Reading

उसतोड मजुरांच्या गाड्या अडवल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांना अटक व सुटका

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १६ सप्टेंबर उसतोड मजुरांच्या प्रश्नांवर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत,आज  बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी बीड जिल्ह्यातील आष्टी येथे शिराळ वाकी चौकात उसतोड मजुरांच्या गाड्या अडवल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली.मात्र, त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली आहे. बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी आष्टीत मजूर […]

Continue Reading

डोक्यात कुऱ्हाड घालून मुलाने केली आईची हत्या

औरंगाबाद, दिनांक ३ सप्टेंबर एका माथेफिरूने आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिची निघृण हत्या केली आहे. सदर घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाळापूर या गावात घडली आहे. सदर घटनेमुळे गावासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आईचा खुुन केल्याची माहिती  स्वतः मुलानेच मामाला कळवली.आईची हत्या केलेल्या आरोपीचे नाव रमेश असून, तो मनोरुग्ण आहे. दरम्यान त्याच्यावर औरंगाबाद येथील एका रुग्णालयात […]

Continue Reading

परभणीचे शिवसेना खासदार बंडु जाधव यांचा राजीनामा

• पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविले राजीनामा पत्र परभणी, दिनांक २६ ऑगस्ट स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गळचेपी होत असलेल्याचे कारण देत परभणीचे शिवसेना खासदार बंडू जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेे राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या इतर कोणत्याही मंत्री अथवा नेत्याने बंडू जाधव यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले नाही. दुसऱ्या बाजूला शिवसेना […]

Continue Reading

रावसाहेब दानवेंचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोटासाठी अर्ज

• रावसाहेब दानवे यांच्यामुळे त्रस्त झाल्याने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली. सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १३ ऑगस्ट       “कौटुंबिक त्रासाला कंटाळून केंद्रीय मंत्री रावसाहेब दावने यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती स्वतः हर्षवर्धन […]

Continue Reading

औरंगाबाद मनपा आयुक्त व पोलिस अधिक्षक दांपत्य होम क्वारंटाईन

आचाऱ्याला कोरोना : अस्तिक कुमार पांडे व मोक्षदा पाटील होम क्वारंटाईन ; कोरोना विरोधी मोहिमेला धक्का..! औरंगाबाद ,दिनांक २५ जून “महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे व पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आचाऱ्याला कोरोना झाल्यामुळे हे दांपत्य होम क्वारंटाईन झाले आहेत. यामुळे औरंगाबाद मधील कोरोना विरोधी मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.” अस्तिक कुमार पंडे हे जळगाव […]

Continue Reading

धक्कादायक :कोरोनाग्रस्त रुग्णांना बाहेरून औषधी आणण्याची शिफारस ; लातूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठांताना कारणे दाखवा नोटीस

लातूर, दिनांक २० जून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकार कडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान आता एक धक्कादायक प्रकार लातूर येथून समोर आला आहे. लातूर मधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय विज्ञान संस्थेच्या रुग्णालायत कोरोनाग्रस्त […]

Continue Reading

रेशन धान्य घोटाळा: तपासाअंती नायब तहसीलदारांना अटक

बीड, दिनांक २२ मे गेवराई तालुक्यात उघडकीस आलेल्या रेशन धान्य घोटाळ्याची फिर्याद देणाऱ्या नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना पोलिसांनी तपासाअंती आज दुपारी ताब्यात घेतले आहे. रेशन घोटाळ्यात महसूल अधिकाऱ्यांना अटक झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.काही दिवसांपूर्वीच गेवराई येथे रेशनचे गहू तांदूळ आणि साखर व सहा मालवाहू ट्रक असा तब्बल एकूण 70 लाख रुपयांचा माल […]

Continue Reading