त्रिपुरा घटनेचे पुसद शहरात पडसाद : दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता

                    घटनेची माहिती मिळताच यवतमाळ पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पुसद शहरात दाखल पुसद | राजेश ढोले ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने महाराष्ट्र राज्यभर आपली दुकाने, व्यवसाय बंद ठेऊन शुक्रवारी निषेध व्यक्त केला. पुसद शहरातही मुस्लिम समाजाने स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेऊन त्रिपुरा […]

Continue Reading

निंबी – कवडीपूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ग्रामस्थांचे लसीकरण

यवतमाळ |राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) पुसद तालुक्यातील ग्रामपंचायत निंबी-कवडीपूर येथील सरपंच मयुरभाऊ राठोड व सदस्यांच्या पुढाकारातून  लसीकरण शिबीराचे आयोजन गजानन मंदिर साईविहार येथे करण्यात आले. कोविड प्रतिबंधात्मक लस आरोग्य केंद्र फेट्रा येथे मिळते. परंतु तेथील गर्दी टाळण्यासाठी व केंद्रांचे अंतर जास्त असल्याने येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात  जवळपास ८० […]

Continue Reading

खाकी वर्दीतील दर्दी कलावंत सपोनी पंकज विनोद कांबळे

यवतमाळ | राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) पोलीस खाते म्हटले की वेगवेगळ्या ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त, गुन्ह्यातील तपासाची दिशा, गुन्हेगारीला आळा घालणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरीची कामे हे ओघाने आलेच. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस सेवेत असलेल्या प्रत्येकाला ताणतणाव येतो. अशा कर्तव्याच्या धावपळीत अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस […]

Continue Reading

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड रुग्णालयात फळे वाटप

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस यवतमाळ | राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा ६७ वा वाढदिवस वंचित बहुजन आघाडीच्या वणी तालुका व शहरातील कार्यकर्त्यांनी कोविड रुग्णालयात फळे वाटप करून साजरा केला. परसोड येथील कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल […]

Continue Reading

मृतदेहाची अदलाबदल : संतप्त नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड

यवतमाळ | राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) नेहमीच वादग्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील डॉ. शहा कोविड रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.रुग्णालयात चक्क  मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समोर येताच नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारत रूग्णालयाची तोडफोड करत संताप व्यक्त केला. यवतमाळ येथील नामांकित असलेले अॅड. अरुणराव गजभिये यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी डॉ.शहा कोविड रुग्णालयात दाखल झालेले होते. सात […]

Continue Reading

आजाद समाज पार्टीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अशोक भालेराव

यवतमाळ| राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) भीम आर्मीचे संस्थापक तथा आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली आजाद समाज पार्टीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी पुसद येथील अशोक भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. ‌     पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान व प्रदेश मुख्य महासचिव मनिष साठे यांनी अशोक भालेराव यांची निवड केली.नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र देण्यात […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडीच्या उमरखेड तालुकाध्यक्षपदी संतोष जोगदंडे तर शहराध्यक्षपदी अॅड. रफीउल्ला खान यांची निवड

उमरखेड जि. यवतमाळ‌|सिटीझन मिरर वार्ता वंचित बहुजन आघाडीच्या उमरखेड तालुका व शहर कार्यकारिणी निवडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात येऊन तालुकाध्यक्षपदी  संतोष जोगदंडे सर शहराध्यक्षपदी अॅड. रफी उल्ला खान यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब  आंबेडकर यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी केली आहे. ‌ नवीन कार्यकारणीत अशोक दामोधर यांना सोशल मीडिया प्रमुख बनविण्यात आले असून […]

Continue Reading

पुसदच्या भूमिपुत्राने उभारलेले भव्य कोविड सेंटर

पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी स्वीकारले सामाजिक दायित्व पुसद |राजेश ढोले यवतमाळ जिल्ह्यात  बाधितांची  वाढती रुग्ण लक्षात घेता पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद  यांनी अवघ्या तीन दिवसात १०० खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. पुसद येथील माहूर रोड परिसरात गणोबा मंगल कार्यालयात सदरचे कोविड सेंटर रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे. पुसद शहराला यवतमाळ जिल्ह्यात […]

Continue Reading

राज्यात व्यसमुक्ती ग्राम संरक्षण कायदा लागू करा – सत्यशोधक समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अकोला| राजेश ढोले (विदर्भ विभाग प्रतिनिधी) सत्यशोधक सेवा समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्ति ग्राम संरक्षण कायदा लागू करण्यात यावा,यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सत्यशोधक सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष अविनाश राठोड यांच्या मार्गदर्शनात गजानन हरणे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता, इंजि.रमेश पवार महासचिव, दौलत चौथाणी प्रदेश अध्यक्ष मीडिया सेल, अकोला जिल्हाध्यक्ष नितीन गवई महिला […]

Continue Reading

मांडवा येथील जिल्हा परिषद शाळेला घाणीचा विळखा

यवतमाळ|राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळा मांडवा शाळेसमोरील नाल्यावरील धाबा (रपटा) साप न केल्यामुळे नालीचे पाणी शाळेच्या आवारात जात होते . यासंदर्भतील तक्रार ग्रामसेवकांकडे नागरिकांनी केल्यानंतर ग्रामसेवकांनी नालीवरील धाबा (रपटा) साफ न करताच शाळेच्या गेटसमोर सिमेंट काँग्रेटचा बांध टाकल्याने  शाळेच्या गेटसमोरील नालीचे पाणी नालीत न जाता रोडवरून […]

Continue Reading