रिपब्लिकन सेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख तातेराव हनवते यांना जातीय शिवीगाळ करून धमकावणाऱ्या उमरखेड पोलिसांवर कारवाई करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

पुसद| राजेश ढोले, दिनांक १२ सप्टेंबर पिंजर येथील प्रकरणासंदर्भात उमरखेड पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलेले रिपब्लिकन सेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख तातेराव हनवते यांना जातीय शिवीगाळ करत पोटात दाबून धमकावणाऱ्या पोलिसांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन दिले. रिपब्लिकन सेनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तातेराव हनवते दिनांक नऊ […]

Continue Reading

निळ्या झेंड्याचा अपमान करून दलितांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा ; भीम आर्मी

पुसद | राजेश ढोले, दिनांक १३ सप्टेंबर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात निळ्या झेंड्याचा अपमान करत बौद्ध समुदायाच्या महिला व पुरुषांना लाठीचार्ज करून मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी संघटनेने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पुसद येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केली आहे. भीम आर्मी […]

Continue Reading

खा.भावना गवळी व खा.हेमंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून राष्ट्रीय किसान मोर्चाने केले आंदोलन

पुसद | राजेश ढोले,दिनांक ३१ ऑगस्ट  केंद्र सरकारने दिनांक ५ जून २०२० रोजी शेतकरी विरोधी काढलेल्या अध्यादेशाचा धिक्कार करत राष्ट्रीय किसान मोर्चाने आज पुसद येथे खा.भावना गवळी व खा.हेमंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळयाचे तहसील कार्यालय परिसरातील जयस्तंभाजवळ दहन करून आंदोलन केले. राष्ट्रीय किसान मोर्चाने दिनांक १८ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींना निवेदन देऊन केंद्र शासनाने काढलेल्या दिनांक […]

Continue Reading

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा- लहुजी क्रांती मोर्चाची राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे मागणी

• बहुुुुजनवादी संघटनांचेे समर्थन पुसद| राजेश ढोले,दिनांक २८ ऑगस्ट               साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा यासारख्या वाईट चालीरितींना संपविण्यासाठी प्रेरणादायी साहित्य लिहीले.महीलांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडून त्याचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला दिशादर्शक साहीत्य दिले.यामुळे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी पुसद येथील लहुजी […]

Continue Reading

पत्रकाराशी उद्धट वर्तन करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यासाठी पत्रकारांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

पुसद| राजेश ढोले,दिनांक २६ ऑगस्ट यवतमाळ जिल्हातील मारेगाव येथील पत्रकार सचिन काकडे यांनी गाव विकासात्मक झालेल्या कामाची माहिती ग्रामसेवक निलेश म्हसे यांना मागितली. आपण केलेले बोगस कामाचे पितळ उघडे पडणार या धास्तीने ग्रामसेवक यांनी पत्रकाराला माहिती देण्याची टाळाटाळ करून असभ्य भाषेचा शब्दप्रयोग करीत हूज्जत घातली. पत्रकाराला माहिती न देता असभ्य भाषेचा वापर करीत हूज्जत घालणाऱ्या ग्रामसेवकावर […]

Continue Reading

आठवडी बाजारातील सट्टा जुगारावर पोलिसांचा छापा; मुद्देमालासह आरोपी अटकेत

पुसद| राजेश ढोले, दिनांक २५ ऑगस्ट आठवडी बाजारातील  सार्थक लॉटरी सेंटर समोर सुरू असलेला श्रीदेवी वरळी मटका सुरु असल्याच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद पोलिसांनी छापा टाकून आरोपींना मुद्देमालासह अटक केली. पुसद शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सट्टा मटका जुगार सुरू असल्याची नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ओरड होत आहे. सहाय्यक पोलिस अधिक्षक […]

Continue Reading

समाजात द्वेष पसरवणाऱ्या लोकशाही द्रोही प्रवीण तरडे यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- भिम टायगर सेना

पुसद| राजेश ढोले,दिनांक २५ ऑगस्ट संविधानावर गणपती मांडून लोकशाहीला धार्मिकतेकडे नेणारे कृत्य हे देशद्रोहाचे असल्याने या घटनेचा तीव्र निषेध करीत आरोपी प्रवीण तरडे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करावे लागेल. असा इशारा भिम टायगर सेनाने दिला आहे. भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत निवेदन […]

Continue Reading

यवतमाळ जिल्ह्यात आज ५५ रुग्णांची नव्याने भर तर ४२ कोरोना मुक्त

यवतमाळ | राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) दिनांक २२ ऑगस्ट   वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ४२ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ५५ पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. आज (दि. २२) नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या ५५ जणांमध्ये ३४ पुरुष आणि २१ महिला आहेत. […]

Continue Reading

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदार विरोधातील अध्यादेशाची होळी

पुसद |राजेश ढोले, दिनांक २०‌ ऑगस्ट  महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बाधंकाम विभागाने कंत्राटदार विरोधात काढलेल्या  अध्यादेशाची पुसद येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी होळी केली. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक ३० जुलै रोजी काढलेला अन्यायकारक जी.आर रद्द करण्यात यावा. हा शासन निर्णय राज्यातील कंत्राटदारावर अन्याय करणारा असून तो त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र […]

Continue Reading

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे वृक्षारोपण

  पुसद|राजेश ढोले, दिनांक २० ऑगस्ट निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ  या राज्यस्तरीय संस्थेच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारणीतर्फे जिल्हाध्यक्ष पंडितराव मस्के यांच्या नेतृत्वात गीताई केंद्र पुसद येथील परिसरात, स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.पर्यावरण पूरक उपक्रम सतत राबवून समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम करणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.तसेच केंद्र व महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित […]

Continue Reading