खा.भावना गवळी व खा.हेमंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून राष्ट्रीय किसान मोर्चाने केले आंदोलन

पुसद | राजेश ढोले,दिनांक ३१ ऑगस्ट  केंद्र सरकारने दिनांक ५ जून २०२० रोजी शेतकरी विरोधी काढलेल्या अध्यादेशाचा धिक्कार करत राष्ट्रीय किसान मोर्चाने आज पुसद येथे खा.भावना गवळी व खा.हेमंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळयाचे तहसील कार्यालय परिसरातील जयस्तंभाजवळ दहन करून आंदोलन केले. राष्ट्रीय किसान मोर्चाने दिनांक १८ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींना निवेदन देऊन केंद्र शासनाने काढलेल्या दिनांक […]

Continue Reading

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ३१ ऑगस्ट देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात प्रणव मुखर्जी यांनी आपल्या कार्याची छाप सोडली होती.गेल्या […]

Continue Reading

विठ्ठल मंदिरात प्रवेश करत प्रकाश आंबेडकरांचा आंदोलन

• हजारो वारकरी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात घेतला सहभाग   • मंदिर प्रवेशानंतर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी भाजपाच्या घंटानाद आंदोलनावर वर केली टीका    •पंढरपूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ३१ ऑगस्ट राज्यातील मंदिर खुली करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वारकरी सेनेने पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात […]

Continue Reading

सुप्रीम कोर्टाचा अनादर प्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयांचा दंड

• दंड न भरल्यास तीन महिन्याचा तुरुंगवास सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ३१ ऑगस्ट सुप्रीम कोर्टाच्या अवमान केल्याप्रकरणी  प्रसिद्ध विधिज्ञ प्रशांत भूषण यांना न्यायालयाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. दंड नाही भरल्यास त्यांना तीन महिन्यांचा तुरूंगवास होऊ शकतो तसंच त्यांना तीन वर्षे वकिलीची प्रॅक्टिस करता येणार नाही. न्या.अरुण मिश्रांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.प्रशांत भूषण यांनी आपल्या […]

Continue Reading

रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची भिम आर्मी भारत एकता मिशन संघटनेची मागणी

यावल ,दिनांक २८ ऑगस्ट राज्यातील अनुसूचित समाज घटकातील नागरिकांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या रमाई घरकुल योजनेचा निधी वितरित होत नसल्याने असंख्य कुटुंबांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातही सर्वच तालुक्यांमध्ये रमाई घरकुल योजना मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना  पहिल्या व दुसऱ्या टप्प्यानंतर निधी मिळाला नसल्याने ‌ अनेक कुटुंबे ‌ पावसाळी वातावरणात उघड्यावर आले […]

Continue Reading

जळगाव शहरातील व्यापारी संकुल आता सलग पाच दिवस सुरू राहणार

• महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांचे आदेश जळगाव, दिनांक २८ ऑगस्ट जळगाव शहरातील व्यापारी संकुले शनिवार रविवार असे दोन दिवस वगळाता आता सलग पाच दिवस सुरू राहतील असे आदेश महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आज शुक्रवार, दिनांक २८ ऑगस्ट रोजी दिले आहेत. या निर्णयाचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे.या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार आहे. कोरोना […]

Continue Reading

गणेश मंडळाच्या पाठीमागे चालणाऱ्या न्हावी येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

• आठ जुगाऱ्यांना अटक  ; १२ हजारांचा मुद्देमाल जप्त फैजपूर, दिनांक २८ ऑगस्ट येथून जवळच असलेल्या नावी येथे बस स्थानका मागे गणेश मंडळाच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यांच्याकडून १२ हजार ८६५ रुपये जप्त करण्यात आले आहे. खाऱ्या न्हावी येथील बस स्थानकानजीक गणेश मंडळाच्या आडोशाला ‌ जुगार […]

Continue Reading

अंतिम वर्षाच्या परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पास करता येणार नाही- सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

सिटीझन मिरर वार्ता,दिनांक २८ऑगस्ट Citizen MirrorThe rise of Citizen Mirror as India’s leading online news channel within a short span of its existence owes a lot to the vision of its chairman and editor-in-chief Bharat Sasane and the dedication and toil of its ever-growing team of Citizen Mirror professionals.

Continue Reading

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा- लहुजी क्रांती मोर्चाची राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे मागणी

• बहुुुुजनवादी संघटनांचेे समर्थन पुसद| राजेश ढोले,दिनांक २८ ऑगस्ट               साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा यासारख्या वाईट चालीरितींना संपविण्यासाठी प्रेरणादायी साहित्य लिहीले.महीलांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडून त्याचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला दिशादर्शक साहीत्य दिले.यामुळे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी पुसद येथील लहुजी […]

Continue Reading

गांजा तस्करीत जळगाव जिल्हा घेतोय आघाडी

जळगाव, दिनांक २७ ऑगस्ट वाळू तस्करीत कुख्यात झालेला जळगाव जिल्हा गांजा तस्करीतही ओळखला जाऊ लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच एमआयडीसी पोलिसांनी ३८ लाख १६ हजार रुपयांचा गांजा पकडला आहे. काही महिन्यांपूर्वीच अंमळनेर शहरातही लाखो रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला होता. गांजा तस्करीचे प्रकरण समोर येत असल्याने जळगाव जिल्हा गांजा तस्करीतही पुढे येत असल्याचे चित्र आहे. […]

Continue Reading