भीषण अपघात : भुसावळ – बोईसर बस वीस फूट खोल दरीत कोसळली; १५ जखमी,६ प्रवाशी गंभीर

पालघर / नरेश पाटील भुसावळ येथून बोईसर जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस २० फूट खोल दरीत कोसळल्याने १५ प्रवासी जखमी झाले असून त्यातील ६ प्रवसी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याने बस अनियंत्रित झाल्याचा आरोप अपघातातून वाचलेल्या काही प्रवाश्यांनी केला आहे. अपघातातील जखमी प्रवाशी चालक डी.एन.धनगर,वाहक दिपक शिंदे,यांच्या सह […]

Continue Reading

तिसऱ्या अपत्याची मुसीबत.; पतपेढीचे संचालक झालेल्या‌ नगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपात्रतेची नौबत

.  अमळनेर येथील पू.सानेगुरुजी न.पा.वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सह. पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक श्री.युवराज श्रीपत चव्हाण यांना रघुनाथ रामभाऊ मोरे यांच्या तक्रारीवरून सहाय्यक निबंधकांनी अपात्र घोषित केले आहे. अमळनेर /  द सिटीझन मिरर वार्ता मागील महिन्यात निवडून आलेले अमळनेर येथील पू.साने गुरुजी न.पा.वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक श्री.युवराज श्रीपत चव्हाण यांना श्री.किशोर पाटील, सहायक निबंधक (सहकारी संस्था) […]

Continue Reading

बुद्ध पौर्णिमा व सखाराम महाराज यात्रोत्सवा निमित्त फरशी रोड येथे युवकांनी केले अन्नदान

अमळनेर / प्रतिनिधी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिन व शहरात सुरू असलेला संत सखाराम महाराज यांचा यात्रोत्सवातील पालखी सोहळ्या च्या पार्श्वभूीवर अमळनेर शहरातील फरशी रोड येथील युवकांनी अन्नदान केले. संपूर्ण जगभरात बुध्द पौर्णिमा संपन्न झाली. याच दिवशी राज्यात प्रसिद्ध असलेल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला पालखी […]

Continue Reading

घरात घुसून वकिलास मारहाण; पाच जणांना अटक

पुणे/ सिटीझन मिरर वार्ता पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीत राहणाऱ्या वकिलासह त्यांचे वडील आणि कामगाराला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. हनुमंत श्रीकांत पाटेकर (वय ३१, रा. कॉलनी नंबर ५, पंत नगर, जाधववाडी, चिखली), सुग्रीव भीमराव गायकवाड (वय ५७, रा. म्हेत्रे […]

Continue Reading

बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्तीचा डोस पाजण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांचा आक्रमक पवित्रा

अचानक तपासणीत अनेक कर्मचारी गैरहजर… विभाग प्रमुखांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस… जळगाव / सिटीझन मिरर वार्ता महापालिका आयुक्त पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर डॉ. विद्या गायकवाड यांनी बेशिस्त मनपा कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फोडला आहे.कर्मचाऱ्यांना प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी आयुक्तांनी लक्ष घातले असून पहिल्याच दिवशी मनपाच्या इमारतीजवळ ते स्वतः कर्मचाऱ्यांची हजेरी घेत असताना अनेक कर्मचारी कामाची वेळ पाळत […]

Continue Reading

जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेला अमळनेर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद ; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेसह नागरिकांनी दिला बंधुभावाचा संदेश

पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेत मान्यवरांसह सर्वधर्मीय नागरिकांनी संदेश लिहून घेतला सहभाग     अमळनेर /सिटीझन मिरर वार्ता राज्यात मागील काही दिवसांपासून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजविघातक प्रवूर्त्ती कडून सुरू असल्याचे दिसत असताना अमळनेर शहरातील जनतेने आपापसातील बंधुभाव जोपासत जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक […]

Continue Reading

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे प्रतिक सपकाळे यांचा युवा भूषण पुरस्काराने गौरव

जळगाव / सिटीझन मिरर वार्ता आंबेडकरी चळवळीतील युवक कार्यकर्ते तसेच आयटीआय च्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे धामणगाव गावातील प्रतिक सपकाळे यांना पुणे येथील निर्मिका फाऊंडेशन या संस्थेने युवा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला लोकप्रतिनिधी अनेक मान्यवर उपस्थित होते.महाकवी वामनदादा कर्डक यांचे नातू श्री. हरेशभाई देखणे हे निर्मिका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष […]

Continue Reading

सलाईन काढून डिस्चार्ज पेपरवर जबरदस्तीने सही घेतली; नवाब मलिक यांच्या वकिलांचा ईडी अधिकाऱ्यांवर आरोप

मुंबई /सिटीझन मिरर वार्ता मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असणारे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जे. जे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची सलाईन काढून डिस्चार्ज पेपरवर जबरदस्तीने सही घेण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांचे वकील ऍड. निलेश भोसले यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केला आहे. यासंदर्भात न्यायालयाने ईडी अधिकाऱ्यांना […]

Continue Reading

खळबळजनक : मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याकडं २५०० कोटींची मागणी केल्याचा भाजपा आमदाराचा दावा ; कर्नाटकात राजकीय चर्चेला उधाण

बंगळूरू / सिटीझन मिरर वार्ता कर्नाटकातील भाजप आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी २५०० कोटींची मागणी करण्यात आली होती असा दावा केल्याने कर्नाटकात खळबळ उडाली असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते  डीके शिवकुमार यांनी केली आहे. लिंगायत पंचमसाली समाजाच्या अधिवेशनात बोलताना विजयपुरा […]

Continue Reading

जळगाव शहरातील कुंटणखान्यात विकृत शौकीनांची रंगलेली मैफिल पोलिसांनी उधळली

जळगाव / सिटीझन मिरर वार्ता मागील अडीच वर्षात जळगाव शहरातील उच्चभ्रु वस्तीतील सुरू असलेले कुंटणखाने पोलीस कारवाई नंतर बंद पडतील असे वाटत असताना आजही अनेक वसाहतीत चोरून लपून गरजू महिलांना वाम मार्गाला लावून शौकिनांची शारीरिक भूक भागविणारा अनैतिक धंदे सुरू असल्याची चर्चा नेहमीच होत असते. असाच एक कुंटणखाना नवीन सम्राट कॉलनीत सुरू असल्याची माहिती मिळताच […]

Continue Reading