बापरे.. बिहारच्या क्वाॅरंटाइन सेंटरमध्ये बकासूर; दिवसातून 40 पोळ्या आणि आठ ते दहा प्लेट भात एवढा मोठा खुराक

राष्ट्रीय

सिटीजन मिरर वार्ता, दिनांक ३० मे

पुराणकथांमध्ये आपण बकासुराबद्दल ऐकल आहे. एखादा खादाड आपल्या नजरेसमोर पडला तर आपण त्याला बकासुराची उपमा देतो. असाच एक बकासूर बिहार मधील बक्सर येथील काॅरंटाइन केंद्रात दाखल आहे. दिवसाला पोळ्या आणि आठ ते दहा प्लेट भात एवढा दणकून खुराक असणाऱ्या या व्यक्तीमुळे काॅरंटाईन केंद्रातील अन्नधान्याचा साठा लगेच संपत आहे. बक्सर येथील मांजवरी क्वारंटाइन सेंटरवरील एक २३ वर्षीय तरुण सध्या त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. अनुप
ओझा असं या तरुणाचं नाव आहे.राजस्थानवरुन बिहारमध्ये परतलेला हा तरुण दिवसाला ४० पोळ्या आणि ८ ते १० प्लेट भात खातो. बरं सकाळ संध्याकाळ असा दोनवेळा त्याला ऐवढे अन्न लागते. ओझा याच्या अती खाण्याच्या सवयीमुळे केंद्रावर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दहा व्यक्तींना पुरेल एवढे अन्न एकच व्यक्ती खात असल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे समजल्यानंतर अधिकारी संभ्रमात पडले आणि त्यांनी स्वत: जाऊन काय प्रकरण आहे हे जाणून घेण्याचा निर्णय घेतला.यासंदर्भातील वृत्त ‘डेक्कन हेराल्ड’ने दिलं आहे.

अनुपच्या खाण्याच्या सवयीबद्दल जाणून घेण्यासाठी अधिकारी दुपारच्या जेवणाच्या वेळी केंद्रावर पोहचले. त्यावेळी अनुप खरोखरच एकावेळी १० जणांना पुरेल इतकं खाणं खात असल्याचं पाहून अधिकारीही चक्रावले.
.एका व्यक्तीसाठी एवढ्या पोळ्या (चपात्या) बनवून आता येथील स्वयंपाकीही कंटाळला आहे.
ओझाचे क्वारंटाइनचे दिवस संपत आले आहेत. त्यामुळे त्याला अन्नाची कमी पडता कामा नये असं अधिकाऱ्यांनी स्वयंपाक्याला सांगितलं आहे. त्याला हवं तेवढं जेवण देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *