दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण; पाकिस्तानच्या लष्करी दवाखान्यात दाखल

आंतरराष्ट्रीय

सिटिझन मिरर वार्ता, दिनांक ६ जून

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महेजबीन या दोघांना कोरोना झाल्याचे बातमी समोर येत आहे. दाऊदला कोरोना झाल्यामुळे त्याचे खासगी कर्मचारी आणि अंगरक्षकांना क्वारंटाइन करण्यात आल्याचे वृत्त आहे. दाऊद इब्राहिमला कोरोनाचा संसर्ग झाल्येच वृत्त सीएनएन न्यूज १८ ने दिलं आहे.त्याच्यावर कराचीमधील लष्करी रुग्णालयामध्येच उपचार सुरु असल्याचे सीएनएनचे म्हणणे आहे.

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून अनेक वर्षांपासून तो भारताला हवा आहे. दाऊद हा मुंबई १९९३ साली झालेल्या साखळी बॉंबस्फोटाचा आरोपी आहे. इंटरपोलने त्याच्या विरुद्ध नोटीस बजावली आहे. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याची घोषणा भारत आणि अमेरिका यांनी २००३ मध्ये केली होती. त्याच्यावर २.५० लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. १९९३ च्या बॉम्ब स्फोटांच्या आरोपामुळे त्यांच्यावर सदर बक्षीस ठेवण्यात आले आहे.


पाकिस्तानची लबाडी उघड.

वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती ब्रिटनमधील एका न्यायालयाला मागील वर्षी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली होती. मागील अनेक वर्षांपासून दाऊदला आम्ही आश्रय दिला नाही असं पाकिस्तान सांगत असतानाच आता त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. दहा दिवसांपूर्वीच दाऊद लष्कर ए तोयबाच्या काही लोकांना भेटल्याचेही या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तो काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमधून कराचीमध्ये आल्याचे सांगण्यात येत आहेत. भारताने मागील अनेक वर्षांपासून दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याचे म्हटलं होतं. तसेच यासंदर्भात पाकिस्तानने चौकशी करुन दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याच्या मागण्याही अनेकदा करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्येक वेळेस पाकिस्तानने दाऊद पाकिस्तानमध्ये नाही असं सांगत त्याची पाठराखण केली होती. मात्र आता कोरोनामुळे पाकिस्तानचं पितळं उघडं पडलं आहे.दाऊदला कोरोनाचा झाल्याचे वृत्तसमोर संसर्ग आल्यानंतर आता पाकिस्तानने या वृत्ताला दुजोरा दिल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा विरोध सहन करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *