कुंटणखाना : जळगाव शहरातील लागोपाठ उघडकीस येणाऱ्या घटनांनी समाजमन चिंतित

क्राइम

जळगाव, दिनांक ९ मे

शहराचे नाव खराब करणाऱ्या एकामागोमाग एक अशा निंदनीय घटना मागील काही महिन्यात सातत्याने घडत आहेत. अशाच घटनांच्या मालिकेतील समाज मन खराब करणाऱ्या कुंटनखान्यांचा वाढता प्रसाराचा उल्लेख करावा लागेल. वाघ नगर मध्ये पोलिसांनी एका कुंटणखान्यावर छापा मारला. त्यापूर्वी जुना खेडी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये हाय प्रोफाईल कुंटणखान्यावर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच कारवाई केली होती. त्या अगोदर काही महिन्यांपूर्वी पिंप्राळा येथील एका अपार्टमेंटमध्ये असाच प्रकार पोलिसांनी छापा टाकून उघड केला होता. लागोपाठच्या अशा निंदनीय घटनांमुळे जळगाव शहराचे नाव खराब होत चालले आहे. गरजू व असहाय महिलांना हेरून काही समाजकंटकांकडून त्यांना वाममार्गाला लावण्याचे प्रयत्न होत असल्याचे अशा घटनांवरून समोर आले आहे.

पिंप्राळा येथे काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या कुंटणखान्यात एका राजकीय पक्षाशी संबंधित महिलेचा संबंध असल्याचे समोर आले होते. यामुळे कुंटणखान्याना राजकीय अभय मिळत तर नाही ना असा सवाल देखील उपस्थित झाला होता. काही दिवसांपूर्वीच जुना खेडी रोड वरील एका अपार्टमेंटमध्ये महाविद्यालयीन तरुणी देखील आढळून आल्या.
‌‌ वाघ नगर मध्ये एका पोलिसाचे घर भाड्याने घेऊन तेथेच कुंटणखाना सुरू करण्याचा धक्कादायक प्रकार कालच पोलीस कारवाई झाल्यानंतर उघडकीस आला. वाघ नगरातील शिक्षक कॉलनीत भाड्याच्या घरात कुंटणखाना चालविणारी मालकीण व तिचा पती यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेतील पीडितांपैकी एक नांदगाव जिल्हा नाशिक तर दुसरी सुरत येथील रहिवासी आहे. पोलीस कारवाईनंतर दोघेही पीडितांना अशादिप वस्तीगृहात रवाना करण्यात आले आहे.
अडीच दशकांपूर्वी जळगाव शहरात बहुचर्चित सेक्स स्कैंडल देशभरात गाजले होते. अशा घटनांमुळे महिलाच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. गरीब व गरजू असहाय महिलांना हेरून त्यांना वाममार्गाला लावणाऱ्या समाजकंटकांच्या काही टोळ्या कार्यरत असण्याची शक्यता आहे. जळगाव पोलिसांनी सातत्याने कुंटणखान्यावर कारवाई केल्याने यास थोडाफार पायबंद बसेल. शहरातील काही हॉटेल्स, लॉज यामध्येही मोठ्या प्रमाणावर अशा स्वरूपाचे व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी नियमितपणे लॉज हॉटेल्स यांची तपासणी करावी अशी मागणी होत आहे.

1 thought on “कुंटणखाना : जळगाव शहरातील लागोपाठ उघडकीस येणाऱ्या घटनांनी समाजमन चिंतित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *