ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोनाची लागण ; दिल्लीत दवाखान्यात सुरू

राष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक‌ ९ जून

चार महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवी राजे शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांना दक्षिण दिल्लीस्थित साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं असून, तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी ट्विटरवर दिली आहे.ज्योतीरादित्य यांना घशात खवखव आणि ताप अशी लक्षणे दिसून आल्यावर चार दिवसांपूर्वीच हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. तर त्यांच्या आईला सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. मात्र तरीही खबरदारीचा पर्याय म्हणून दोघांचीही चाचणी करण्यात आली होती. त्यांच्या दोघांचेही रिपोर्ट्स कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे माध्यमातील सूत्रांकडून समजत आहे.

प्राप्त माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे लॉक डाऊन सुरु झाल्यापासून आपल्या कुटुंबासमवेत दिल्ली मध्येच वास्तव्यात होते. त्यांना कोरोनाची लागण नेमकी कोणाच्या माध्यमातून झाली याचा सध्या तपास केला जात आहे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आता विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे

काँग्रेस ते भाजप, ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजकीय प्रवास

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात ‘महाराज’ म्हणूनच ओळखलं आणि संबोधलं जातं.

तीन महिन्यांपूर्वी म्हणजे मार्च महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकारही कोसळलं. शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *