केजरीवाल यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

राष्ट्रीय

सिटिझन मिरर वार्ता, दिनांक १० जून

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोना टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंगळवार दिनांक ९ जून रोजी तपासणीसाठी त्यांचे स्वॅब नमुने घेतले गेले होते. ताप आणि घश्यात खवखव होत असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सर्व बैठक रद्द करून स्वत:ला आयसोलेट केलं होतं. मंगळवारी टेस्टसाठी त्यांचे स्वॅब नमुने घेतले गेले आणि मंगळवारीच रिपोर्ट पण आला. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे शुभचिंतक केजरीवाल यांच्या रिपोर्टची वाट बघत होते. टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता सर्वांनाच दिलासा मिळालाय.

दिल्लीत कोरोनाचे १७ हजारपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण
दिल्लीत आतापर्यंत २८ हजार ९३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी १७ हजार १२५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी १० हजार ९९९ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळं दिल्लीत आतापर्यंत ८१२ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली सरकारनं राज्यातील हॉटेल आणि बँक्वेट हॉल गरज पडल्यास हॉस्पिटलमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्येत बिघडण्याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भातली माहिती राज्याला दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *