मंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव; काही मंत्री झाले क्वारंटाईन

राज्य

मुंबई ,दिनांक १२ जून

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या काही मंत्र्यांनीही खबरदारी घेत स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. ठाकरे मंत्रिमंडळातील कोरोना पॉझिटिव असणारे धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड व अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर दोघेही कोरोना मुक्त झाले आहेत.

मुंबईत मंत्रालयाच्या समोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगला परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या बंगला परिसरातील कर्मचारी वस्ती असलेल्या भागातही कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये मुंडेंच्या स्वयंपाकी, मदतनीस यांचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांच्यासह सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत.

10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. वर्धापन दिन आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आल्याने ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *