धोक्याचा इशारा: भारतात समूह संसर्गाला सुरुवात; केंद्र‌ सरकारने सत्य स्वीकाराव -तज्ञांची सुचना

राष्ट्रीय

सिटीजन मिरर वार्ता, दिनांक १३ जून

देशात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे रोज येणाऱ्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यामुळे देशात समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. मात्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने देशात समोर संसर्गाला सुरुवात नाही झाल्याचे वृत्त यापूर्वी फेटाळून लावलं होतं. तथापि समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा तज्ञांचा दावा धोक्याची सूचना देणारा आहे. सरकारच्या अडथळ्यामुळे हे सत्य स्वीकारलं जात नाही. समूह संसर्ग झाल्याचं सत्य केंद्र सरकारनं स्वीकारावं, जेणेकरून लोक गैरसमजात राहणार नाही, अशी सूचना तज्ज्ञांनी सरकारला केली आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे माजी संचालक डॉ.एम.सी. मिश्रा यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या पाहणी वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.”देशातील अनेक भागात समूह संसर्ग झालेला आहे, यात कसलीही शंका नाही. देशातून लॉकडाउन शिथिल केल्यानंतर व लोकांची गर्दी बाहेर पडू लागल्यानं रुग्णांची संख्या वेगात वाढली आहे. त्याचबरोबर ज्या भागात एकही रुग्ण नव्हता, तिथेही करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलं आहे. आयसीएमआरच्या पाहणीत सध्याची परिस्थिती दिसून आलेली नाही. सरकारनं पुढे येऊन समूह संसर्ग झाल्याचं मान्य करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोक गैरसमजात राहणार नाही आणि अधिक काळजी घेतील,” असं मिश्रा यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *