शाळा-महाविद्यालयासह मेडिकल,पॅरा मेडिकल कॉलेजची फी कमी करा-युनायटेड नर्सेस असोसिएशनची मागणी

उत्तर महाराष्ट्र

नाशिक | प्रतिनिधी, दिनांक १३ जून

चालू शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ या वर्षाकरिता कोणतीही सवलत न देता पूर्ण फी भरण्याची सक्ती मुलांच्या पालकांकडे ‌ शैक्षणिक संस्था चालक करीत असून फी न भरल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात पालकांच्या परिस्थितीचा विचार करून शाळा महाविद्यालयांसह मेडिकल, पॅरा मेडिकल कॉलेजच्या फी पन्नास टक्‍क्‍यांनी कमी करण्यात यावी. अशी मागणी युनायटेड नर्सेस असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजय भास्‍कर मराठे यांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात संघटनेच्यावतीने नाशिकच्या जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

राज्यातील विविध संस्था व राजकीय संघटनांकडून अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी होत असताना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची तयारी दाखविली जात आहे. कोरोनाचे महाभयंकर संकट उभे असतांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी व संरक्षण कोण करणार असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे.

सध्याची परिस्थिती पाहता कोणतेही शाळा-महाविद्यालय रेगुलर न करता ऑनलाइन अभ्यासक्रम पद्धती लागू करण्याचा शासनाकडून विचार सुरू आहे. यामुळे पालकांना लॅपटॉप, पीसी, इंटरनेट, इलेक्ट्रिसिटी हा जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. करुणा महामारीमुळे अनेक पालकांचे रोजगार गेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तर आणि पालकांचे दोन दोन तीन तीन महिने पगार होत नसल्याने व काही ठिकाणी पगार कपातीची स्थिती असल्याने आर्थिक अडचणी आल्या आहेत. दुसरीकडे शाळा महाविद्यालय संस्थाचालकांचा ऑनलाइन पद्धती मुळे इलेक्ट्रिसिटी बिल,मेंटेनन्स खर्च, कॉम्प्युटर लॅब, केमिकल लॅब, प्रोजेक्टर/प्रेझेन्टेशन लॅब व इतर काही खर्च हा ६०% पेक्षा कमी होणार आहे तसेच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मैदानी खेळ, वार्षिक सहल, औद्योगिक भेट,वार्षिक महाविद्यालयीन कार्ये आणि दिवस कमी होणार आहे. यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शाळा-महाविद्यालयांसह मेडिकल , पॅरा मेडिकल कॉलेजची फी ५० टक्‍क्‍यांनी कमी करावी असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर युनायटेड नर्सेस असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजय भास्कर मराठे,गोकुळ शेळके,अविनाश पवार,विशाल जगताप,निखिल केदार,हेमंत पवार ,निखिल वानखेडे,अश्विनी कदम,स्नेहल तायडे आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *