अभिनव पाठशाळेच्या प्रांगणात ज्ञानवर्धिनी फाउंडेशनने केले वृक्षारोपण

जळगाव

जळगाव, दिनांक १४ जून

येथील अभिनव सराव पाठशाळेचे प्रांगण व परिसरात ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण करुन ट्री गार्ड बसविण्यात आले. यावेळी वृक्षारोपण केलेले झाडे जगविण्यासाठी ज्ञानवर्धिनी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संकल्प केला. आणखीही विविध परिसरात फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण करून ट्री गार्ड बसविण्यात येणार आहेत.

वृक्षारोपण करतेवेळी ज्ञानवर्धिनी फाऊंडेशनचे सदस्य व जेसीआयचे झोन उपाध्यक्ष जिंगल जैन, सचिव प्रसाद जगताप, कार्याध्यक्ष ललित नेमाडे, कमलेश अगरवाल यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *