कोरोना विरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सेवक सेवाभावी संस्था सन्मानित करणार

जळगाव

जळगाव, दिनांक १६ जून

राज्यभरात कोरोना महामारी विरोधात सातत्याने कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचारी,प्रशासकीय कर्मचारी,अधिकारी, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विविध संस्था संघटना यांना सेवक सेवाभावी संस्थेकडून महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दिनांक ५ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

महाराष्ट्र गौरव पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. दिनांक २५ मार्च ते ३१ मे पर्यंत कोरोनाविषाणूच्या महामारीत मदतकार्य, सक्रिय योगदान, जनजागृती मोहीम, उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे गौरव सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित न करता पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तींना शहरातील एक दोन प्रतिनिधी नियुक्त करून पुरुस्कार्थींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.

कोरोना महामारीविरुद्ध सक्रिय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांनी श्री विषाल शर्मा, अध्यक्ष, सेवक सेवाभावी संस्था जळगाव (मो.७०६६९६११८१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

4 thoughts on “कोरोना विरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सेवक सेवाभावी संस्था सन्मानित करणार

Leave a Reply