जळगाव जिल्हा अब तक १८५१: कोरोनाची घोडदौड सुरूच, आज आढळले ४० रुग्ण

जळगाव

जळगाव, दिनांक १६ जून

कोरोना विषाणूने जळगाव जिल्ह्यात मांडलेला उच्छाद थांबण्याचे नाव घेत नसून आज पुन्हा ४० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्या १८५१ एवढी झाली आहे. देशाच्या तुलनेत जळगावचा मृत्यूदर चार टक्के अधिक असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष जळगाव जिल्ह्याने वेधून घेतले आहे. वरिष्ठ स्तरावरही याची दखल घेण्यात आली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून नुकतीच जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच कोरोना विरोधात रुग्णांवर उपचार करण्यासाठी १६ डॉक्टरांची नवीन टीम देखील जळगाव जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहे. यास राज्यभरातून अनुभवी परिचारिकांचीही नियुक्ती जळगाव जिल्ह्यात करण्यात आली आहे. या सर्वांवर जळगाव जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा फैलाव नियंत्रित करण्याची मोठी जबाबदारी आहे. नागरिकांनीही अधिक काळजी घेण्याची गरज असून फिजिकल डिस्टंसिंगचे पालन व मास्क वापरणे आवश्यक आहे.

आज जळगाव जिल्ह्यात तालुकानिहाय आढळलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणेजळगाव शहर ३, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ८, अमळनेर ६, पाचोरा २, भडगाव २, रावेर ७ , धरणगाव ३,पारोळा ६,यावल १,जामनेर १

आज ४० रुग्ण आढळल्याने जळगाव जिल्ह्याची रुग्णसंख्या अबतक१८५१ एवढी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *