जळगाव शहरातील घरकाम करणाऱ्या महिलांना कास्ट्राईब महासंघाचा मदतीचा हात; किराणा साहित्याचे केले मोफत वाटप

जळगाव

जळगाव, दिनांक १८ जून

शहरात कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लॉक डाऊन सुरू असल्याने कामधंदे बंद झाल्यामुळे शहरातील घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन कास्ट्राईब महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरकाम करणाऱ्या महिलांना मोफत किराणा साहित्याची वाटप केले.

महासंघाचे जिल्हा सरचिटणीस ब्रह्मानंद तायडे यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. वाढदिवस साजरा न करता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्व:खर्चातून गरजू घरकाम महिलांच्या कौटुंबिक अडचणी व उपासमार लक्षात घेऊन त्यांना किराणा साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. किराणा साहित्य वाटप करताना कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे, जिल्हा सरचिटणीस ब्रह्मानंद तायडे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वाल्हे, राजू कुमावत, मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, कौतिक इंगळे ,अभिजीत येवले हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *