जळगावचे नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वीकारला पदभार

जळगाव

जळगाव, दिनांक १८ जून

जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कधी बदली होण्यापूर्वी ते सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. जळगाव जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यास अपयशी ठरल्याने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याविरुद्ध जळगाव जिल्ह्यात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. नागरिकांचा रोष लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यांच्या जागी अभिजित राऊत यांची जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना आरोग्य यंत्रणेला लावण्यात जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांना अपयश आले होते. जळगाव जिल्ह्याचा कोरणा मृत्यू दर हा देशाच्या तुलनेत चार पट अधिक असतानाही कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यास प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यातच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले असताना त्यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांचा कोणताही वचक नसल्याचे हे स्पष्ट झाले होते. कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याची ओरड सुरू होती. यातच प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे भुसावळ येथील मालती नेहेते या ८२ वर्षीय वृद्धेचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आला होता. त्यात तब्बल आठवडाभर रुग्णालयातून बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेण्यास पोलिस विभाग देखील अपयशी ठरला. या प्रकरणात अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह सहयोगी प्राध्यापक डॉ.सुयोग चौधरी, कनिष्ठ निवासी डॉक्टर कल्पना धनकवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख यांचे निलंबन करण्यात आले. याच प्रकरणात जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारे अभिजित राऊत सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते 2013 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अभिजित राऊत यांना खानदेश नवीन असून यापूर्वी त्यांनी सन २०१५ ते २०१७ या काळात तळोदा, नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार येथे सहाय्यक सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *