धक्कादायक :कोरोनाग्रस्त रुग्णांना बाहेरून औषधी आणण्याची शिफारस ; लातूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठांताना कारणे दाखवा नोटीस

मराठवाड़ा

लातूर, दिनांक २० जून

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकार कडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान आता एक धक्कादायक प्रकार लातूर येथून समोर आला आहे. लातूर मधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय विज्ञान संस्थेच्या रुग्णालायत कोरोनाग्रस्त रुग्णांना महागडी औषधे बाजारातून खरेदी करण्याची शिफारस करण्यात असल्याची बाब समोर आली. याप्रकरणी शासकीय मेडिकल महाविद्यालयांच्या अधिष्ठतांना वैद्यकीय शिक्षण संचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

.दरम्यान,राज्यातील शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालांत कोरोना संसर्ग बाधीत रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावेत असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तरीही अशा पद्धतीचा प्रकार लातूर मधील मेडिकल कॉलेजमधून समोर आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.लातूर मध्ये शुक्रवारी आणखी 3 कोरोनाबाधितांची भर पडल्याने आकडा 220 वर पोहचला आहे. तर काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने कोरोनासंबंधित करण्यात येणाऱ्या चाचणीसाठी 2200 रुपये आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *