राज्यसभा मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपा आमदार कोरोना पॉझिटिव्ह ; अनेक आमदारांच्या संपर्कात आल्याने मध्य प्रदेशात खळबळ

राष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २० जून

मध्य प्रदेशातील भाजप आमदार ओमप्रकाश सकलेचा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका दिवसापूर्वीच राज्यसभेसाठी मतदान करण्याकरिता ते विधानसभेत आले होते. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या आमदारांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत देवीलाल धाकड, यशपाल सिंह सिसोदिया, अनिरुद्ध मारू आणि दिलीप सिंह मकवाना या आमदारांनी भोपाळमधील जेपी रुग्णालयात कोरोना चाचणी केली आहे. राज्यसभेसाठी मतदानासाठी आम्ही सकलच्या यांच्यासोबत असल्याने सुरक्षेच्या कारणाने आम्ही कोरोनाची चाचणी दिल्याचे आमदारांनी सांगितले. आमदार संकलेचा यांच्या पत्नीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यासंदर्भात माहिती देताना आमदार यशपल सिंह सिसोदिया म्हणाले “मागील दोन दिवसांपासून ते सकलेचा यांच्यासोबत होते. शुक्रवारी मतदान सुद्धा सोबतच केले. शुक्रवारी १४ आमदारांसह आम्ही एकत्रित जेवण केले होते. यासाठीच आम्ही कोरोना चाचणी सुरक्षेच्यादृष्टीने करून घेतली आहे. सकलेचा यांच्या संपर्कात आलेल्या इतर आमदारांनीही कोरोना चाचणी करून घेतली पाहिजे.”

याआधी काँग्रेसचे आमदार कुणाल चौधरी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी पीपीई किट परिधान करून राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान केले.

जेपी रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ.आर. के. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार आमदार यशपाल यांच्या पत्नीनेही कोरोना चाचणी दिली आहे. चार आमदार, सुरक्षा रक्षक, वाहन चालक यांच्यासह पंधरा जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले आहेत.

आमदार सकलेचा यांचा फार्म हाउस मध्ये होता मुक्काम

ओमप्रकाश सकलेचा हे जावद विधानसभाक्षेत्रातून निवडून आले आहेत. येथेच त्यांच्या घराशेजारील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. सकलेचा याच ठिकाणी कोरोना संक्रमित झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या घरा शेजारील महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमदार सकलेचा त्यांच्या पत्नी सोबत फार्म हाऊस मध्ये राहत होते. फार्म हाऊस मध्ये राहत असताना ते अनेक लोकांशी संपर्कात होते तसेच आपल्या मतदारसंघातील काही कंटेनमेंट झोनमध्ये देखील गेले होते.या नंतर सकलेचा १६ जुन रोजी भोपाळ येथे आल्यानंतर त्यांचा अनेकांशी संपर्क आला.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

आमदार सकलेचा यांनी राज्यसभा मतदानापूर्वी भाजपा विधिमंडळ बैठकीतही सहभाग घेतला. विधानसभा सचिवालयाने राज्यसभा मतदानाच्या दिवसाचे कुठेच काढण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यसभा मतदानापूर्वी मध्य प्रदेश भाजपा विधिमंडळ बैठकीत सहभागी आमदार सकलेचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *