गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्या आरएनएस कंपनीला १४ कोटीचा दंड ; तहसीलदारांनी बजावली नोटीस

विदर्भ

वाशिम, दिनांक २१ जून

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारा मुरूम वेदर रित्या उत्खनन करणाऱ्या आर एन एस इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीला मानोरा येथील तहसीलदारांनी १४ कोटी १५ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे अवैध रेती व मुरूम उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, अकोला आणी॔ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए च्या रुंदीकरण आणि सुधारण्याचे काम सुरू आहे. या कामातील आणी॔ ते हातना या रस्त्याच्या कामाचे कंत्राट कर्नाटकातील आरएनएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले आहे. मात्र मंजूर ब्रास मुरूम परिमाणापेक्षा कित्येक पटीने या कंपनीने अवैध मुरमाचे उत्खनन केल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती.

मानोरा तालुक्यातील सावळी गावातील गट क्रमांक १३ मधिल राजनंदनी ढाले यांच्या खाजगी मालकीच्या जमिनीवर २५०० ब्रास मुरूम उत्खनन करून वाहतूक करण्याचा परवाना अप्पर जिल्हाधिकारी वाशिम यांनी १८ फेब्रुवारी २०२०ते १७ मार्च २०२० या कालावधीसाठी दिला होता. परंतु आरएनएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने याच गटातील २.६९ हे.आर. क्षेत्रावर विनापरवाना २२११९ मुरमाचे अवैध उत्खनन केले. कंपनीकडून ऑक्टोबर २०१९ पासून विनापरवाना अवैध मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक होत असल्याची तक्रार वाई गौळ येथील ॲड. श्रीकृष्ण राठोड, किशोर राठोड, महेश जाधव आणि फुलचंद राठोड यांनी प्रशासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या तरतुदीनुसार अवैध उत्खनन केलेल्या वाळू ब्रास परिमाणाच्या बाजारभावातील किंमतीच्या पाच पट दंड १४ कोटी १५लाख ६१ हजार ६०० रुपयांचा दंड मानोरा चे तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण यांनी आरएनएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला ठोठावला आहे. यामुळे वाशिम जिल्ह्यातील वाळू व मुरूम तस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *