उमरखेडची लेक स्नेहल रहाटे राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण; उपजिल्हाधिकारी पदी निवड

विदर्भ

पुसद| राजेश ढोले, दिनांक २१ जून

पार्वती एज्युकेशन संचलित सावित्रीबाई फुले अभ्यासिकेची विद्यार्थिनी करू. स्नेहल रहाटे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे. सध्या अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपरिषदेत या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मरसुळ येथील मुख्याध्यापिका श्रीमती गायकवाड यांच्या कन्या असलेल्या स्नेहल रावटे यांनी यापूर्वी सन २०१७ मध्ये एमपीएससी परीक्षेत यश संपादन केले होते. त्यावेळी एएसओ व एसटीआय पदाकरिता अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला होता.

राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून पार्वती एज्युकेशन संचालित सावित्रीबाई फुले अभ्यासिका येतील विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे. स्नेहल रहाटे यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याने उमरखेड सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रेरणा मिळेल असे मत पार्वती ग्रुपचे संस्थापक व्ही. के. शिरडकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *