आशेचा किरण : फॅबीफ्लु करणार कोरोनाचा खात्मा ; ग्लेनमार्क कंपनीच्या फेवीपिरवीर औषधाच्या मार्केटिंगला डीसीजीआयची मान्यता

मुंबई

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २२जून

संपूर्ण जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा जवळपास एक कोटीच्या घरात गेला आहे. कोरोनावर अद्याप प्रभावी लस तयार झालेली नाही. यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जगभरातल्या औषधी कंपन्यांना मागे टाकत ग्लेनमार्क फार्मास्युटिकल या भारतीय कंपनीने आशेचा किरण दाखवला आहे. अॅन्टीवायरल ड्रग फेवीपिरवीर या औषधाचा कोरोनाग्रस्त रुग्णांवर चांगला परिणाम दिसून आला आहे.कोविड -१९ व या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. ग्लेनमार्क कंपनीच्या दाव्यानुसार, कोरोनाग्रस्त रुग्णांच्या शरीरात चार दिवसातच विषाणूंची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. या औषधास फॅबीफ्लु असे ब्रँड नाव देण्यात आले आहे.

ग्लेनमार्क कंपनीने २० जून रोजी पत्रकार परिषद घेऊन औषधाच्या चार क्लिनिकल चाचण्या बाबत माहिती दिली आहे. पैकी दोन चीनमध्ये तर रशिया आणि चीन मध्ये प्रत्येकी एक क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. चीनमधील एका अभ्यासातही रुग्ण घेण्यात आले. त्यांच्या परिणामांचा अभ्यास केला गेला. लोपिनविर सारखी इतर औषधे एका ग्रुपला देण्यात आली.तुलनात्मक अभ्यासातून स्पष्ट झाले की ज्या रुग्णांना औषध देण्यात आले त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूंची संख्या कमी झालेली दिसून आली. चीनमध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या अभ्यासात २३६ रुग्णांचा समावेश होता. यातही औषधाने चांगला परिणाम दाखविला आहे.

फॅबीफ्लु हे औषध टॅबलेटच्या स्वरूपात आहे.फॅबीफ्लु औषध कोरोनाचे सौम्य व कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर वापरण्यात येईल असा निर्णय कंपनीने घेतला आहे. या औषधाच्या मार्केटिंगला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मान्यता दिली आहे.कोविड -१९ वर उपचार करणारे फॅबिफ्लू टॅबलेट हे भारतातील पहिले औषध आहे. या औषधाला डीसीजीआयने औषधाच्या मार्केटींगला मान्यता दिली आहे आणि त्याचबरोबर औषधाचा डोसही निश्चित केला आहे. शिफारसीनुसार, पहिल्या दिवशी १८०० मिलीग्रामची दोन डोस घ्यावी लागतील. त्यानंतर, ८०० मिलीग्रामच्या दोन डोस १४ दिवसांसाठी घ्याव्या लागतील.पुढच्या आठवड्यापर्यंत ही अँटीव्हायरल औषध बाजारात सहज उपलब्ध होईल आणि त्याच्या एका टॅबलेटची किंमत फक्त १०३ रुपये असेल.फॅबीफ्लु या ब्रँड नावाने बाजारात येणारी औषध फेवीपिरवीर गोळ्याच्या रूपात असेल.

औषध निर्माता ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सच्या म्हणण्यानुसार, फॅबीफ्लु फेवीपिरवीर औषधाची किंमत फक्त १०३ रुपये असेल.त्यात एका स्ट्रीपमध्ये ३४ गोळ्या असतील. स्ट्रीपची कमाल किरकोळ किंमत ३५०० रुपये असेल.

Leave a Reply