पीपीई किटसह मेडिकल कचरा रस्त्यावर ; भुसावळच्या कोळंबे हॉस्पिटलचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतणार; लोकसंघर्ष मोर्चा ने केली कारवाईची मागणी

भुसावळ

भुसावळ, दिनांक २३ जून

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दवाखान्या मधील मेडिकल कचरा व पीपीई किट यांची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असताना भुसावळच्या कोळंबे रुग्णालयाकडून मात्र भररस्त्यावर मेडिकल कचरा फेकून देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने डॉ. स्वप्नील कोळंबे यांना सक्त ताकीद देऊन कारवाई करावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे व चंद्रकांत चौधरी यांनी केली आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याने त्यापासून देशातल्या नागरिकांचा बसाव होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथरोग नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी सुरु आहे. अशा परिस्थितीत दवाखान्यात मधून निघणारे वेस्टेज मेडिकल मटेरियल इंजेक्शन, सलाईन, ग्लोज व पीपीई किट आदि नष्ट करणे आवश्यक आहे. दवाखान्यात थेट रुग्णांची संबंधित असल्याने मेडिकल कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावलेला गेल्यास सार्थ रोगांना आमंत्रण मिळून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. मात्र भुसावळ शहरातील दीनदयाल नगर मध्ये असणाऱ्या डॉक्टर स्वप्नील कोळंबे यांच्या रुग्णालयातील मेडिकल कचरा नष्ट न करता तो थेट उघड्यावरच टाकला जात असल्याचे साथ रोगास निमंत्रण मिळाले आहे.याची तातडीने दखल घेऊन डॉक्टर स्वप्नील कुंदे यांना सक्त ताकीद देऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे व चंद्रकांत चौधरी यांनी केली आहे.

3 thoughts on “पीपीई किटसह मेडिकल कचरा रस्त्यावर ; भुसावळच्या कोळंबे हॉस्पिटलचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतणार; लोकसंघर्ष मोर्चा ने केली कारवाईची मागणी

  1. आपला व्हॅटसएप गृप नाही का whatsaap गृप तयार करावा जेणेकरून माहिती देत येईल

    1. लवकरच व्हाट्सअप ग्रुप तयार करीत आहोत. सूचना केल्या बद्दल खूप खूप आभार

  2. लावकरच ग्रुप क्रिएट करत आहोत. सूचना केल्याबद्दल धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *