भाजपा कार्यालयात स्वाधी प्रज्ञासिंह ठाकूर बेशुद्ध ; अचानक झाली तब्येत खराब

राष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २३जून

भाजपाच्या बहुचर्चित खासदार प्रज्ञासिंह ठाकूर भोपाळ येथे श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अचानक बेशुद्ध होऊन खाली पडल्या. कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना दवाखान्यात हलविले आहे.

जनसंघाचे दिवंगत नेते प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे भाषण सुरू असताना खा. प्रज्ञासिंह ठाकूर अचानक चक्कर येऊन खाली पडल्या. असे सांगितले जात आहे की त्या खूप वेळ उभे राहिल्यामुळे त्यांना चक्कर आले.

गेल्या महिन्यात ३१ मे रोजी खा.प्रज्ञासिंह ठाकूर यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याची वार्ता होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *