कोरोनावरील औषधाची योग्य माहिती द्या, त्याशिवाय जाहिरात करता येणार नाही; आयुष मंत्रालयाचा पतंजलीला आदेश

राष्ट्रीय

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २३ जून

संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना विषाणूवर औषध शोधल्याचा दावा पतंजली समूहा’ने केला होता. कोरोनिल या नावाने योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहाने बाजाराची औषध आणली आहे. मात्र या औषधाची योग्य माहिती दिल्याशिवाय त्याची जाहिरात करू नका अशी तंबी आयुष मंत्रालयाने बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योगसमूहाला दिली आहे.

आयुष  मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की,पतंजली उद्योग समूहाने तयार केलेल्या कोरोना वरील औषधाची दखल घेण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत या औषधाची तपासणी होत नाही तोपर्यंत या औषधाने कोरोना बरा होतो अशा प्रकारची जाहिरात पतंजली उद्योग समुहाने करू नये असे आदेश वजा तंबी आयुष मंत्रालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *