मनपाच्या मार्केट उघडण्यासाठी गोलाणी मार्केट सिंधी संगतचे पालकमंत्र्यांना साकडे

जळगाव

लाॅक डाऊनमुळे उपासमारीची वेळ; व्यापाऱ्यांनी मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी

जळगाव,दि.२४जून

कोरोना संसर्गामुळे देशभरात लाॅकडाऊन सुरू झाले आहे. यामुळे जळगाव शहरातील मनपाच्या व्यापारी संकुलातील दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार करून मनपाच्या मालकीचे दुकाने उघडण्यास परवानगी द्या किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या अशा उद्विग्न भावना गोलाणी मार्केट सिंधी संगतने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे व्यक्त केल्या.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात निवेदनात म्हटले आहे की.”सरकारने लाॅकडाऊन घोषित केल्यानंतर आम्ही व्यापाऱ्यांनी गरजू नागरिकांना अन्नधान्य, औषधी, मोफत जेवण वाटप करुन  सरकारला सहकार्य केले. दुकान मधील कामगारांना दुकाने बंद असतानाही पगार दिले. त्यावेळेस लाॅकडाऊनचा काळ अधिक असे असे वाटले नव्हते. मात्र सरकार कडून लाॅकडाऊन  वेळोवेळी  केल्याने व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाॅकडाऊनचा दुसरा तिसरा टप्पा एकदम शासनाची आठवण देणारा ठरला. शासनाने लाॅकडाऊन  आहे घोषित करून नागरिकांना बेरोजगारीच्या गर्तेत लोटले, मजूर,नागरिकांवर पोलीसांची मारहाण, मनपाकडून व्यापाऱ्यांना दंड करणे, पुण्यात दाखल करणे असे प्रकार होत आहे. त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शंभर दिवसांपेक्षा जास्त काळ दुकाने बंद असल्याने घेतलेल्या कर्जाचे हप्ते, मनपाचे वेगवेगळे टॅक्सेस, लाईट बिल, मुलांचे शाळेची फी याबाबत रोजच नोटिसा येत आहेत. व्यवसाय बंद झाल्याने आता पैसे आणायचे कुठून असा प्रश्न उपस्थित राहिल्याने शहरातील मार्केट उघडण्याची परवानगी द्यावी किंवा स्वेच्छा मरण्याची परवानगी द्यावी.

यावेळी गोलाणी मार्केट सिंधी संगतच्या पदाधिकाऱ्यांनी लाॅकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांना येत असलेल्या समस्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी महेश चावला, जवाहरलाल ललवाणी, सुनील आर्या, पुनम राजपूत यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *