कोपरा येथे क्षुल्लक कारणावरून दोन गट भिडले

विदर्भ

गाडीला कट मारण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी ; पोलिसांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न

पुसद |राजेश ढोले, दिनांक २४ जून

काल बुधवार दिनांक २३ जून रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास उमरखेड रस्त्यावर कोपरा गावात  गाडीचा कट लागण्याच्या क्षुल्लक कारणावरून युवकांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली.

घटनेची माहिती मिळताच पुसद शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक माधुरी यावलीकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. युवकांच्या जमावाने आणि पोलिसांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान पुसद शहरातील एका परिसरातील युवकांचा मोठा जमाव घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला.यातील काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हाणामारीत जखमी झालेल्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनास्थळी उपविभागीय अधिकारी अनुरागत जैन, तहसीलदार प्रा. वैशाख वाहुरवाघ, शहर पोलिस ठाण्याचे पोनि. पांडुरंग फाडे, वाहतूक शाखेचे ब्रिजपाल सिंह, सपोनि. विजय रत्नपारखी, पोउनी. माधुरी यावलीकर यांनी शांततेसाठी प्रयत्न करून जमावाला पांगविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *