खळबळजनक : अर्भकाचे केले पाच तुकडे

उत्तर महाराष्ट्र

महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे तुकडे करणारा डॉ. गंधे अटकेत

अहमदनगर, दिनांक २५ जून

 

 महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे बारीक तुकडे करण्यात आल्याची खळबळजनक घटना अहमदनगर तालुक्यातील जखणगाव येथे घडली आहे. अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टर शंकर गंधे याला अहमदनगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.”

अहमदनगर तालुक्यातील जखणगाव येथे गंधे मॅटर्निंटी होम हॉस्पिटल येथे एका महिलेचा गर्भपात होतं असल्याची माहिती  मिळाल्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयामधील आरोग्य विभागाच्या एका पथकाने तालुका पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये छापा टाकला. यावेळी गर्भपाताचं संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

पोलिसांनी गंधे हॉस्पिटलमध्ये छापा टाकला असता एका स्त्रीचा नुकताच गर्भपात करून अर्भकाचे पाच तुकडे करण्यात  आल्याचे आढळून आले.याबाबतची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे.गंधे हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपात प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागांन संबधित आरोपी डॉक्टर गंधे याची चौकशी केली असता चौकशीमध्ये गर्भपात केलेला अर्भक हे १७ आठवड्यांचं असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी डॉ.शंकर गंधे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कलम ३१२, ३१३, ३१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे ज्या महिलेचा गर्भपात करण्यात आला त्या महिलेला अगोदर ३ मुली आहेत. त्यामुळे चौथ्यांदा काढलेल्या सोनोग्राफीमध्ये देखील मुलगी असल्याची शंका व्यक्त झाल्याने हा गर्भपात करण्यात आला असल्याचं संबधित महिलेने सांगितलं आहे. दरम्यान, अवैधरित्या गर्भपात करून अर्भकाचे ५ तुकडे केल्याप्रकरणी संबधित डॉक्टर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून हा गर्भपात संबधित महिलेच्या मर्जीनुसार झाला असल्यास तिला देखील आरोपी करण्यात येणार असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

गर्भपात केल्यानंतर अर्भकाचे करण्यात आलेल्या तुकड्यामुळे अर्भक हे मुलगा आहे की मुलगी हे नेमके सांगणे कठीण असल्याने त्या अर्भकाचे तुकडे फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *