अभिनेता गोविंदा यांचा मुलगा अपघातात बाल बाल बचावला

मुंबई

गोविंदा यांच्या कारला अपघात; मुलगा यशवर्धन चालवत होता गाडी

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २५ जून

हिंदी सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांच्या मुलाच्या गाडीचा मुंबईतील जुहू परिसरात अपघात झाला. गोविंदा यांचे पुत्र यशवर्धन आहूजा स्वतः गाडी चालवत होते. अपघातात गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, यशवर्धन आहूजा यांच्या गाडीला दुसर्‍या एका कारने मागून धडक दिली. यात गोविंदांच्या गाडीच्या हेडलाईट तुटले. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताचे वृत्त मिळताच गोविंदा व त्यांचा मुलगी घटनास्थळी हजर झाले. दोन्ही पार्टीने एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रार न करता आपसात प्रकरण मिटवले.

गोविंदा यांना टीना आणि यशवर्धन अशी दोन मुलं आहेत. लॉकडाउनच्या काळात ते कुटुंबीयांसोबतच वेळ घालवत आहेत. यशवर्धनने लंडनमध्ये फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलं. त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत चर्चा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *