औरंगाबाद मनपा आयुक्त व पोलिस अधिक्षक दांपत्य होम क्वारंटाईन

मराठवाड़ा

आचाऱ्याला कोरोना : अस्तिक कुमार पांडे व मोक्षदा पाटील होम क्वारंटाईन ; कोरोना विरोधी मोहिमेला धक्का..!

औरंगाबाद ,दिनांक २५ जून

“महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे व पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आचाऱ्याला कोरोना झाल्यामुळे हे दांपत्य होम क्वारंटाईन झाले आहेत. यामुळे औरंगाबाद मधील कोरोना विरोधी मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.”

अस्तिक कुमार पंडे हे जळगाव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर त्यांच्या पत्नी मोक्षदा पाटील यांनी अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे.अस्तिक कुमार पांडे सध्या महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असून मोक्षदा पाटील औरंगाबाद पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावीत आहे.त्यांच्या घरी काम करणारा आचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे या दाम्पत्यावर होम क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.

 औरंगाबादेत आज एकाच दिवशी रेकॉर्डब्रेक २३० नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ४ हजार २६६ वर पोहोचला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं बोललं जात आहे.

गेल्या २४ तासात औरंगाबादमध्ये १२ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा २१८ वर गेला आहे. जिल्ह्यात १८३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *