पिंप्री येथे कृषी केंद्राचा रासायनिक गोडाऊनची भरारी पथकाकडून तपासणी

जळगाव

खतांचा मुबलक साठा उपलब्ध ; शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- कृषी विभागाची माहिती

धरणगाव |प्रतिनिधी, २७ जून

 

तालुक्यातील पिंप्री खुर्द व परिसरात कृषी विभागाच्या भरारी पथकाने कृषी केंद्राची अचानक तपासणी केली. कृषी केंद्राच्या रासायनिक खतांची तपासणी करताना युरियाचा साठा तपासण्यात आला.

तपासणीदरम्यान त्रुटी आढळलेल्या कृषी केंद्र चालकांना कृषी अधिकारी एस.डी.पाटील, कृषी अधिकारी अभिनव माळी यांचा समावेश असलेल्या भरारी पथकाने समज दिली. धरणगाव पंचायत समितीतील कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रक एस.डी.पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे, शेतांवर पडणारे रोग स्वतः ओळखून त्यानुसारच फवारणी करावी. फवारणी करताना शेतकऱ्यांनी गळणारे पंप हातात घेऊ नये तोंडाला मास्क घेतल्याशिवाय फवारणी करू नये. हवेचा प्रवाह बघूनच फवारणी करावी व फवारणी दरम्यानते कुठलेच पदार्थ खाऊ नयेत. ते पुढे म्हणाले, धरणगाव तालुक्यात युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. विशिष्ट खताची मागणी न करता व युरियाचाही कमी वापर करावा.

कृषी केंद्र चालकांनी   छापील किमतीपेक्षा जास्त भावाने खताची विक्री करू नये व  लिंकींगचा प्रकार करु नये अशी समज कृषी केंद्र चालकांना देण्यात आली.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *