सिव्हिलमध्ये आज पुन्हा एका रुग्णाचा बाथरूम मध्ये पडून मृत्यू; रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

जळगाव

दवाखान्यातील जीर्ण खोल्यांमध्ये दारूच्या बाटल्या; वैद्यकीय महाविद्यालयातील असुविधांबाबत लोकसंघर्ष मोर्चा ने वेधले लक्ष

जळगाव, दिनांक २७ जून

काही दिवसांपूर्वीच भुसावळच्या मालती नेहते ही ८२ वर्षीय वृद्ध  महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शौचालय मध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. हे प्रकरण संपते न संपते तोच आज पुन्हा रुग्णालयातील बाथरूम मध्ये एका रुग्णाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयातील  असुविधांकडे लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी  लक्ष वेधले आहे.

आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल असलेले पंडित अहिरे यांचा बाथरूम मध्ये पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याची विश्वसनीय माहिती आहे. पंडित अहिरे यांना मधुमेहाचा त्रास होता. उपचारादरम्यान त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांना बाथरूम साठी कॅथेडर किंवा बेडपॅन देणे आवश्यक होते. मात्र ते दिले गेले नाही नसल्याने आज सकाळी पंडित अहिरे बाथरूमला गेले. याठिकाणी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर बाब त्यांच्या कुटुंबियांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांना सांगितली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रतिभाताई शिंदे व लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी रुग्णालयात दाखल रुग्णांसोबत माहिती घेत असताना अत्यंत धक्कादायक माहिती देखील मिळाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जिर्ण खोल्यांमध्ये पीपीई किट व रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. ही बाब प्रतिभाताई शिंदे यांनी डॉक्टर पोटे यांच्या निदर्शनास आणून देत रुग्णालयातील जीर्ण खोल्यांमधील घाण सफाई कामगारांना मार्फत तातडीने साफ करण्याची मागणी केली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या सुविधांबाबत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रंगराव यांना लोकसंघर्ष मोर्चाने आज पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मधुमेह असलेले पंडित अहिरे या रुग्णास बाथरूम साठी सुविधा देण्यात आले असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. रुग्णालयाच्या प्रशासनाने कोविड व नोन कोविड रुग्ण यांच्यातील आजाराचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या बेड पर्यंत जेवणाची व्यवस्था तसेच कॅथेडर व बेडपॅनची सुविधा रुग्णालयाकडून उपलब्ध करून देण्यात यावी.

अधिष्ठातांना देण्यात आलेल्या पत्रावर लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांच्यासह आज बाथरूम मध्ये मृत्यू झालेल्या पंडित अहिरे यांचा मुलगा कुणाल अहिरे, सचिन धांडे, माजी नगरसेवक राजू मोरे, भरत कर्डिले यांच्या सह्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *