मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुलतानी कर्ज वसुली

विदर्भ


जनजीवन सुरळीत होईपर्यंत कर्ज वसुली न थांबल्यास आंदोलन ; अखिल भारतीय नौजवान सभेचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

पुसद | राजेश ढोले,दिनांक २७ जून

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व मायक्रोफायनान्स कंपन्या व इतर आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थाना जनतेकडून ऑगस्ट २०२० पर्यंत कर्जवसुली करू नये तसेच थकीत हप्त्याची वसुली टप्प्याटप्प्याने करण्यात यावी असे निर्देश दिले असतानाही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुलतानी पद्धतीने कर्ज वसुली होत आहे. ही कर्ज बसले थांबवण्याचे आदेश मायक्रोफायनान्स कंपन्यांना द्यावेत अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा ऑल इंडिया युद्ध फेडरेशने (अखिल भारतीय नौजवान सभा) पुसदचे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

केंद्र सरकारने कोरोना महामारी मुळे मार्च 2020 पासून लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे पुसद शहरासह संपूर्ण देशातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते . अलीकडेच काही दिवसांपासून लॉकडाऊन च्या नियमांत शिथिलता करण्यात आली परंतु अजूनही सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले नाही . तसेच केंद्र सरकारने सर्व मायक्रोफायनान्स कंपन्या व इतर आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थाना जनतेकडून ऑगस्ट 2020 पर्यंत कर्जवसुली करू नये तसेच थकीत हप्त्याची वसुली टप्प्याटप्प्याने करण्यात यावी असे आदेशीत केले होते

मायक्रोफायनान्स कंपन्याकडून शासनाच्या आदेशाकडे कानाडोळा करून सुलतानी पद्धतीने कर्जवसुली करण्यात येत आहे . त्यामुळे बचत गटांमध्ये मोठया प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे .सदर कर्ज हे ग्रामीण व शहरी भागातील स्त्रियांना मोठया प्रमाणात वाटप करण्यात आले आहे . कोरोना महामारी मुळे लोकांचा रोजगार पूर्णतः बंद झाल्याने ग्रामीण भागासोबत शहरी जनतेची आर्थिक स्थिती ढेपाळली आहे. आर्थिक व्यवहार सुरळीत व्हायला अंदाजे अजून काही महिने लागू शकतात. त्यामुळे लोकांची कर्ज फेडण्याची इच्छा असतांना सुद्धा ते कर्ज फेडू शकत नाही . यामुळे जोपर्यंत जनजीवन व आर्थिक व्यवहार सुरळीत होत नाहीत तोपर्यंत मायक्रोफायनान्स कंपन्यांनी सुलतानी पध्दतीने सुरू केलेली कर्जवसुली थांबविण्याचे व लॉकडाऊन काळातील थकीत हप्त्यावर व्याजदर लागु न करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देतांना अखिल भारतीय नौजवान सभेचे निखिल टोपलेवार, शंकर टारफे, महेंद्र बारसागडे, विजय निखाते , पवन खिल्लारे , विद्यासागर महेशकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *