मांडवा स्मशानभूमीतील गैरसोय होणार दूर

विदर्भ

गोपाल अरुण मंदाडे यांनी स्मशानभूमीला दिले पाच टिनपत्रे भेट

पुसद|राजेश ढोले, दिनांक २७ जून

तालुक्यातील मांडवा स्मशानभूमी वरील शेड उडून गेल्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन गोपाल अरुण मंदाडे यांनी पाच टिनपत्रे भेट दिली आहेत.

मांडवा येथील स्मशानभूमी ही गावापासून जवळच व पुसद ते शेंबाळपिपरी रोड लगत आहे . ह्या स्मशानभूमीतील शेडवरील एका बाजूकडील दोन टिन तसेच दुसऱ्या बाजूकडील तीन टिन पावसामुळे उडून गेले होते. अशा परिस्थितीत पावसाळा सुरू असल्यामुळे पाऊस केंव्हा येईल याचा अंदाज बांधता येत नाही .त्यामुळे अंत्यविधी प्रक्रिया पार पाडण्यासाठी जर पाऊस आल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र अर्धनग्न झालेल्या स्मशानभूमीतील शेडकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाले होते.

स्मशानभूमीची अवस्था पाहून ग्राम परिवर्तन समिती, मांडवाचे अध्यक्ष गोपाल अरुण मंदाडे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील स्मशानभुमीला आठ फूटी पाच टिन देऊन व स्मशानभूमीच्या अर्धनग्न झालेल्या शेडचे टिनपत्रे बसवून आपले सामाजिक दायित्व निभावत  करून आदर्श निर्माण केला.

यावेळी पोलीस पाटील दत्तराव पुलाते, उपसरपंच नागोराव टेकाळे, तुकाराम चव्हाण, ग्रा.पं. कर्मचारी प्रदुम्न आबाळे , ग्राम परिवर्तन समिती अध्यक्ष गोपाल मंदाडे, उपाध्यक्ष अंकुश घावस, बाळासाहेब ढोले, अंजिक्य महाराज, प्रवीण धाड , महादेव माटे ,भाऊराव आडे, इंदल राठोड , दशरथ चव्हाण, रवि लांडगे, बजरंग राठोड, अजय राठोड इत्यादी ग्राम परिवर्तन समितीचे पदाधिकारी व सदस्य आणि गावकरी उपस्थित होते .हा कार्यक्रम लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून करण्यात आला. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *