पॉझिटिव टू निगेटिव्ह’ : १६ जणांना सुट्टी ;एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु तर एक नव्याने पॉझिटिव

विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव रुग्णांची संख्या ५१, आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू

 


यवतमाळ,दिनांक २८जून

राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)  जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका जणाचा मृत्यु झाला आहे. तर एक जण नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले १६ जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

रविवारी मृत्यु झालेला व्यक्ती (वय ७५) हा नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची संख्या ९ झाली आहे. तसेच आज यवतमाळ तालुक्यातील लाडखेड येथील एक पुरुष नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. शनिवारी जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा ६७ होता. एक मृत्यु व एक नव्याने पॉझेटिव्ह आल्याने ही संख्या ६७ वर स्थिरावली. मात्र रविवारी १६ जणांना रुग्णालयातून सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ५१ वर आली आहे.

गत २४तासात वैद्यकीय महाविद्यालयाला ११५  रिपोर्ट प्राप्त झाले. यात एक जण पॉझेटिव्ह तर ११४ रिपोर्ट निगेटिव्ह आहे. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत ६८ जण भरती आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २६७ झाली आहे. यापैकी तब्बल २०७ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात नऊ जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी ९७ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण ४६६६नमुने तपासणीकरीता पाठवले असून यापैकी ४५०७ प्राप्त तर १५९ अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4240 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *