ग्राहक संरक्षण संस्थेंतर्फे महागाव मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचाऱ्यांना एन 95 मास्क व हॅन्ड ग्लोजचे वाटप

विदर्भ

ग्राहक संरक्षण संस्थेचे प्रदेश महासचिव सुरेश सिडाम पुढाकार घेऊन करीत आहे मोलाची मदत

 

पुसद|राजेश ढोले, दिनांक २८ जून

सर्व सामान्य शेतकरी बांधवांच्या प्रत्येक कामात सहकार्याची भावना ठेऊन मध्यवर्ती सहकारी बँक महागाव मदत कार्य करत आली आहे.पीक कर्ज असो की शेत पीक नुकसान असो या सर्वांचे पैसे याच बँकेतुन शेतकरी बांधवाना उपलब्द होतात.यामुळे या बँकेमध्ये नेहमीच गर्दी राहते. तरी देखील बँक कर्मचारी प्रामाणिक पणे आपले कर्त्यव्य पार पडतांना दिसतात. हे लक्षात घेत ग्राहक संरक्षण संस्थेने मध्यवर्ती बँकेच्या महागाव शाखेतील कर्मचाऱ्यांना एन-95मास्क व हॅन्डग्लोजचे वाटप केले आहे.

कोरोना आजार संपूर्ण जगात फोपावत असतांना मुंबई महाराष्ट्रासह आता तालुक्यातील ग्रामीण भागाकडे फार तीव्र गतीने याचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.यवतमाळची संख्या कमी होऊन अधिक गतीने वाढताना दिसत आहे.त्यातच दिग्रस, दारवा, पुसद, व महागाव या तालुक्याच्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने व काही ठिकाणी मृत पावल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते व काही दिवसांनी ते पॉझिटिव्ह टु निगेटिव्ह झाल्याने सध्याचे वातावरण आटोक्यात आहे. परंतु अधिक दक्षता घेतल्याने कोरोना अर्थात कोविड-१९ या रोगावर आपण सुरक्षेच्या माध्यमाने विजय प्राप्त करू शकतो. ग्राहक संरक्षण संस्था यांनी मध्यवर्ती बँकेच्या महागाव शाखेतील कर्मचाऱ्यांना एन-95मास्क व हॅन्ड ग्लोजचे वाटप करून केलेली मदत सकारात्मक होऊ शकते.

या शाखेतील कर्मचारी शाखा व्यवस्थापक श्री.बहादुरे, वरिष्ठ अधिकारी श्री. भरवाडे,  लेखापाल राजुरकर, रोखपाल डी. व्ही. मस्के, वरिष्ठ लिपिक जय नागरगोजे,कनिष्ठ लिपिक अजय सुकळकर,कनिष्ठ लिपिक अजय राठोड,शिपाई आकाश जाधव,शिपाई शंकर शालीकवाड, चौकिदार गजानन नरवाडे हे सर्व कर्मचारी आपले कर्त्यव्य प्रामाणिक पणे करीत आहेत.

महागाव मध्यवर्ती सहकारी बँकेतील सर्व कर्मचारी बांधवास एन-95मास्क व हॅन्ड ग्लोजचे वाटप करण्यात आले. या वेळी जिपच्या माजी अध्यक्षा आरतीताई फुपाटे, ग्राहक संरक्षण संस्थेचे प्रदेश महासचिव सुरेश सिडाम, आशिष कोटुरवार, मारोतराव आगीसे,अॅड. गजानन देशमुख,संभाजी इंगोले,वंसंत धनवे,बाळू टारफे,ता.अध्यक्ष माया कथळकर,ता.उपाध्यक्षा सुनीता ठाकरे,संध्या बुटलेकर,व इतर पदाधिकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *