जळगाव जिल्ह्याची वाटचाल धोकेदायक वळणावर; रुग्ण संख्येत होणारी वाढ चिंताजनक

जळगाव

कोरोना : जिल्ह्यात आज चार रुग्णांचा मृत्यू तर नवीन १८६ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या झाली ३२६८

जळगाव, दिनांक २८ जून

कोरोना विषाणूचा जळगाव जिल्ह्यात सुरू असलेला उच्छाद थांबता थांबतं असून कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येने बघता बघता तीन हजाराचा टप्पा ओलांडून चार हजाराकडे वाटचाल सुरू केली आहे. जळगाव जिल्हा आता धोकादायक वळणावर येऊन पोचला असून रोज वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. आज जळगाव जिल्ह्यात नवीन १८६ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्या आता ३२६८ एवढी झाली आहे. आज जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील तीन महिला व चाळीसगाव  शहरातील एका पुरुषाचा समावेश आहे. आज ७४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९१३ झाली आहे.

आज तालुकानिहाय आढळलेल्या रुग्णांची संख्या:- (कंसात तालुकानिहाय एकूण रुग्ण)

जळगावशहर-४४(७०५), जळगावग्रामीण-६(१०९), अमळनेर-१७(३०२), भुसावळ-५(४१२), भडगाव-३(१६६), बोदवड-११(५३), चाळीसगाव-५(३८), चोपडा-९(२२३), धरणगाव-८(१४०), एरंडोल-१९(१३४), जामनेर-१९(१७०), मुक्ताईनगर-५(३०), पाचोरा-८(८३), पारोळा-३(२१४), रावेर-१९(२३८), यावल-५(१५१)

एकूण रुग्ण संख्या-१८६(३२६८)

जळगाव जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही विनाकारण कामाशिवाय बाहेर पडू नये. नाकाला मास्क, रुमाल बांधून फिजिकल डिस्टन्सूसिंगचे पालन करणे आवश्यक आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *