राज्यात ३१ जुलैपर्यंत लाॅक डाऊन कायम

मुंबई

“मिशन बिगेन अगेन”चा दुसरा टप्पा सुरू, ठाणे येेथे दहा दिवस कठोर लॉक डाऊन

 

बा

मुंबई, दिनांक २९ जून

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात ३१  जुलैपर्यंत लाॅक डाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.“मिशन बिगेन अगेन” चा दुसरा टप्पा  तेे १ जुलै ते ३१ जुलैपर्यंत असेल.या काळात पहिल्या टप्प्यातील नियम कायम असणार आहेत.

ठाणे शहर व जिल्ह्यात दहा दिवस कठोर लाॅकडाऊन

यावेळी ठाणे मनपा क्षेत्रात २ जुलैपासून १० दिवस कठोर लॉकडाऊन लागू होणार आहे. ठाणे शहरात २ जुलैपासून ११ जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व गोष्टी बंद राहणार आहेत.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. अशावेळी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांमधील कन्टेन्मेंट झोनमध्ये कठोर लॉकडाऊन लागू जारी केला जाणार आहे.

 

Leave a Reply