ऑन ड्युटी मद्याचे घोट., उत्पादन शुल्क निरीक्षकांवर कारवाई

जळगाव

दारुचा प्याला.. निलंबित करून गेला..

जळगाव, दिनांक ३० जून

ऑन ड्युटी मद्याचे घोट रिचवणे उत्पादनशुल्क विभागाच्या निरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. मद्य साठ्याच्या तपासणी दरम्यान मद्य प्राशन करताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव येथील निरीक्षक नरेंद्र दहिवडे यांना निलंबीत करण्यात आले आहे.

शहरातील एका मदयाच्या दुकानात मद्य साठा व इतर नोंदीची तपासणी करत असतांना उत्पादन शुक्ल निरीक्षक नरेंद्र दहिवडे बीयर पीत असल्याचा व्हिडिओ शनिवारी सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.या गंभीर प्रकारची दखल घेऊन उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उत्पादन शुल्क आयुक्तांना याबाबत उच्चस्तरिय चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.  सोमवार दिनांक २९ जून रोजी नाशिक येथील उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त व त्यांच्या पथकाने जळगाव येथे येऊन चौकशी केली. चौकशी अहवाल  तयार केल्यानंतर निरीक्षक नरेंद्र दहीवडे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, लाॅक डाऊन सुरू असतांना जिल्ह्यातील सर्व परमीटरूम, बियर बार, देशी-विदेशी मद्यविक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना दारूची वाहतूक सर्रासपणे करण्यात आली. नशिराबाद येथील गोडाऊन मधूनच हा सर्व प्रकार झाला होता. नशिराबाद येथे ज्या गोदामातून मद्याचा साठा पुरविण्यात आला त्याठिकाणी  नियंत्रण अधिकारी म्हणून नरेंद्र दहिवडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. जळगाव उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षकपद मागील सहा महिन्यांपासून रिक्त असल्याने जिल्ह्यातला उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. कोणाचेच कुणावर अंकुश नसल्याने “आंधळयांचा चकणा राजा” अशीच काहीशी जळगावचा राज्य उत्पादन शुल्क विभागाची परिस्थिती झाली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *