निवेदन :जातीयवाद्यांवर कारवाई करा

विदर्भ

लाॅक डाऊनच्या  काळात मागासवर्गीय,आदिवासी, बौद्धांवरील अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भिम आर्मी भारत एकता मिशनची मागणी

 

पुसद | राजेश ढोले, दिनांक ३० जून

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखराज्यात व केंद्रात लागलेल्या लाॅक डाऊनच्या काढून राज्यातील मागासवर्गीय, आदिवासी, बौद्धांवर काही गावगुंड अत्याचार करीत असल्याच्या अनेक घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. शासनाने अशा जातीयवादी गाव गुंडांवर कारवाई करावी अशी मागणी भीमा आर्मी भारत एकता मिशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पुसद विभागाचे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

नरखेड तालुक्यातील नागपूर जिल्हा पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिथिलेश उमरकर या राजकीय गावगुंडानी त्याच्या साथीदारासोबत उच्चशिक्षित बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आली.त्यांच्यावर ३०२ व ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा तसेच या गुन्ह्याची चौकशी सीबीआय अथवा एसआयटी मार्फत करण्यात यावी,अरविंद बनसोडे,विराज जगताप यांच्या पीडित कुटुंबाला पन्नास लाखांची आर्थिक मदत व शासकीय नोकरीत सामावून घ्यावे,गजानन राऊत या मुख्य साक्षीदारास पोलीस संरक्षण देण्यात यावे,विशेष सरकारी वकीलांची नेमणूक तात्काळ करण्यात यावी, शिर्डी येथील सागर शेजवळ या बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आली होती त्यातील मारेकऱ्यांचा पॅरोल तात्काळ रद्द करण्यात यावा, बीड जिल्ह्यातील मांगवडगाव येथे तीन पारधी आदिवासी मजुरांची निरघुन हत्या करण्यात आली ती केस जलदगती न्यायालयात चालविण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले.

ह्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्यात अन्यथा भिम आर्मी भारत एकता मिशनचे  नेहाताई शिंदे, महाराष्ट्र राज्य प्रमुख मनीष साठे महाराष्ट्र मुख्य महासचिव व विदर्भ प्रभारी यांच्या मार्गदर्शनानुसार विदर्भ प्रमुख अमरावती विभागाचे ॲड. सचिन पट्टेबहादूर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदनावर भीम आर्मीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष देवा जगताप ,अशोक भालेराव, शेख मेहबूब,   अशोक मुंडेवार, प्रसाद खंदारे ,आकाश सावळे, स्वप्निल पाईकराव, विजय निखाते, नितेश पाईकराव, रामदास कांबळे, संजयकुमार हनवते ईत्यादी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *