माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

विदर्भ

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने केला जयंती दिन साजरा

पुसद | राजेश ढोले, दिनांक २ जुलै

येथील युवक मंडळ द्वारा संचालित, वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची १०७ वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्राचार्य एन. व्ही.राठोड सर व पर्यवेक्षक तथा जेष्ठ शिक्षक शिवशंकर घरडे सर यांनी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही अभिवादन केले.

यावेळी जेष्ठ शिक्षिका रजनी हिरुळकर,राजेश बुरबुरे,बी. एन. जाधव,प्रा.एन. टी. राठोड ,प्रा.एस. एल.राठोड, सुबोध बहादूरे,अभिजित राठोड,संजय राठोड ,ए. बी. राठोड प्रा.रश्मी डेकाटे,बी.एन. डोक, जी. के .वडे, विजय राठोड,बाळू कऱ्हाळे,विष्णू इंगळे , लिपिक पांडुरंग जाधव ,वसतिगृह अधीक्षक आडे सर उपस्थित होते.सदर कार्यक्रम वसंतराव नाईक मागासवर्गीय वसतिगृहात संपन्न झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *