एसटी कॅन्टीन व परवाना धारकांना परवाना शुल्क व स्थानिक कर माफ करावे-विभाग नियंत्रकांकडे मागणी

विदर्भ

पुसद| राजेश ढोले, दिनांक २ जुलै

संपूर्ण देशामध्ये कोरोना संसर्गजन्य रोगाने हाहाकार घातलेला आहे.कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने २२ मार्च २०२९ पासून एस.टी.ची वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती.

एसटी महामंडळाची बस सेवा ठप्प झाल्यामुळे बस स्टॅन्ड मधील एसटी कॅन्टीन व इतर अस्थापना वरील परवानाधारकांची सगळी दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार २२ मार्च २०२० पासून एसटी बस स्टँड मधील एसटी कॅन्टीन,अस्थापना वरील स्टॉल पूर्णपणे बंद आहेत. एसटी महामंडळाची वाहतूक ठप्प असल्याकारणाने व शासनाच्या आदेशानुसार स्टॉल बंद असल्याने परवानाधारक यांना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचे कालावधीमधील संपूर्ण परवाना शुल्क व स्थानिक कर पूर्णपणे माफ करण्यात यावा अशी मागणी  परवानाधारक असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हा वाहतूक नियंत्रक आकडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने एसटी कॅन्टीन व स्टॉल परवानाधारकांनी शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून सहकार्य केलेले आहे. या कालावधीमध्ये सगळी अस्थापना स्टाँल बंद असल्यामुळे शासनाने परवाना शुल्क व स्थानिक कर पूर्णपणे माफ करावा. तसेच विद्युत वितरण कंपनीने सुद्धा या कार्यकाळा मधील विद्युत शुल्क पूर्णपणे माफ करावे अशी सुद्धा मागणी करीत निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *