तथागत गौतम बुद्धांचा मार्ग सध्याच्या आव्हानात्मक संकटात जगाला तारू शकेल-पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय

नवी दिल्ली, दिनांक ४ जुलै

संपूर्ण जग भयानक संकटाचा सामना करीत आहे. या आव्हानात्मक संकटावर  तथागत गौतम बुद्धांचा मार्ग जगाला चालू शकतो असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आषाढी पौर्णिमेनिमित्त संबोधित करताना ते बोलत होते. गौतम बुद्धाने दाखवलेले अष्टांग मार्ग समाज आणि देशांच्या कल्याणा साठी उपयुक्त असल्याचेही त्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राष्ट्रपतिभवनात आगीत कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या व्हिडीओ व्हिडीओ द्वारे संबोधन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार प्रकट करताना म्हटले की, बुद्धाच्या शिकवणीतून प्रेरणा व मन शांती मिळते. बुद्धाच्या मार्गातूनच जागतिक आव्हाने व समस्यांवरील उपाय शोधण्यास मदत मिळू शकेल. बुद्धाचे विचार सर्वकालीन आहेत, भूतकाळात शेती उपयोगी टाकले तसेच ते वर्तमानात आणि भविष्यकाळातही तितकीच उपयोगी आहे. देशवासीयांनी बुद्धांचे विचार कायम स्मरणात ठेवावे असेही त्यांनी यावेळी म्हटले. आज गुरुपौर्णिमा आहे. यामुळे आपण सर्व तथागत बुद्धाला नमन करत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *