बारामतीत पुन्हा कोरोनाची एंट्री

पुणे

•आज एकाच दिवसात सहा जनांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह                                  • अजितदादांच्या काटेवाडीतिल दोन  मित्रांना लागण

पुणे,दिनांक ४ जुलै

राज्यात कोरोनाचा उच्छाद सुरूच असून कोरोनामुक्त झालेल्या पवारांच्या बारामतीत पुन्हा कोरोनाने एन्ट्री केली आहे. आज शनिवारी एकाच दिवसात सहा जण कोरोना  पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

शहरातील वकीलाच्या पत्नीला तर नगरसेवकाच्या मुलाला एमआयडीसी, तांबेनगर येथील एका रहिवाशांला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातील दोन मित्रांना आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत सावळ येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. या सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना मुक्त झालेल्या बारामतीत आता कोरोनाचा धोका वाढला असून आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गाने तीन व्यक्तींचा यात मृत्यू झाला आहे. तर बरे होऊन गेलेल्या रूग्णांची संख्या २० आहे. बारामतीत आता कोरोना पॉझिटिव्ह १० रुग्ण रूई येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

दोन दिवसांपूर्वी ३२ वर्षीय अभियंत्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्याच्याच संपर्कात आलेल्या २८ वर्षीय भावाची तपासणी केली करण्यात आली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. लोणावळा येथे पोलिस पदावर आपली ड्युटी बजावत असताना त्यांच्या सहकाऱ्याला कोरोनाचा संसर्गाची लागण झाली. त्यांना कळाल्यानंतर ते आपल्या मूळ गावी बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे आले होते. त्यांनी तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *