बिहारच्या पुढाऱ्यांनी घेतला कोरोनाचा धसका

राष्ट्रीय
  • विधान परिषद सभापती अवधेश नारायण सिंह कोरोना पॉझिटिव

  •  मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः करून घेतली कोरोना टेस्ट, रिपोर्ट येणे बाकी

  • उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी व काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा दिले चाचणीसाठी नमुने
सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ४ जुलै


दोन दिवसांपूर्वी बिहारच्या विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी झाला. आमदारांना शपथ देणारे विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.शपथविधीच्या कार्यक्रमात नितीश कुमार सभापतींच्या अगदी निकट बसले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली आहे.शपथविधी कार्यक्रमात अवधेश यांच्यासमवेत मुख्यमंत्री नितीश कुमार होते. शिवाय दुसऱ्या बाजूला विधानसभेचे सभापती विजय नारायण चौधरी होते आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदीसुद्धा होते.

शनिवारी अवधेश नारायण सिंह यांच्याबरोबर त्यांच्या साऱ्या कुटुंबीयांचा कोविड चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. त्यांच्या असिस्टंटचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. एकाच वेळी बिहारच्या प्रशासनातील सर्वोच्च मंत्री आणि अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. सुरुवातीला दोन चाचण्यांमध्ये अवधेश यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली असे वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *